आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: महिलेने कर्नाटकच्‍या CM चे घेतले चुंबन, वाचा नंतर काय म्‍हणाली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरमैय्या हे पुन्हा एकदा नवीन वादात अडकण्याची चिन्ह आहेत. एका महिलेने जाहीर कार्यक्रमात त्‍यांना किस केले आहे. शहरातील बंगळुरू पॅलेस ग्राउंड येथे कुर्बा समाजाच्या प्रतिनिधीचा अभिनंदन कार्यक्रम होता. या कार्यक्रमात सिद्दरमैय्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत होते.
महिला आहे ग्रामपंचायत सदस्‍य..
एका जाहीर कार्यक्रमात एक महिला मुख्यमंत्री सिद्दरमैय्या यांच्‍या शेजारी उभी होती. तिने चक्‍क मुख्‍यमंत्र्यांचे चुंबन घेतले व ती निघाली. गिरीजा श्रीनिवास असे या महिलेचे नाव असल्‍याची माहिती समोर आली आहे. ती महिला अमृतापूर ग्रामपंचायत सदस्य आहे.
काय म्‍हणाली महिला..
या प्रकरणाचा खुलासा करताना महिला म्‍हणाली, सिद्दरमैय्या हे कुर्बा समाजातील पहिले मुख्यमंत्री आहेत. ते अत्यंत चांगले व्यक्ती आहेत. ते माझ्या वडिलांसारखे असल्यामुळेच मी त्यांचे चुंबन घेतले. (पुढे पाहा व्‍हिडियो..) यावर सिद्दरमैय्या यांनी पण गिरीजा ही माझ्या मुलीसारखी असल्याची माहिती दिली.

राहुल यांच्‍यासोबतही घडला असाच प्रसंग..
राहुल गांधी यांनाही एका महिलेने किस केले होते. तिला पतीने जिवंत जाळले होते. फेब्रुवारी 2014 मध्‍ये आसाममधील जोरहट येथे एका कार्यक्रमात राहुल यांना या प्रसंगाला सामोरे जावे लागले. या घटनेमुळे राहुल चांगलेच हैराण झाले होते. ते तत्‍काळ तेथून निघून गेले. आसाम दौ-यावर महिला कॉंग्रेस कार्यकर्त्‍यांच्‍या कार्यक्रमाला ते गेले होते. माध्‍यमांमध्‍ये या विषयाची मोठ्या प्रमाणात चर्चाही झाली होती. 1 मार्च, 2014 ला या महिलेला तिच्‍या पतीने जिवंत जाळले होते.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, सिद्दरमैय्या यांना महिलेने कसे केले किस.. बघा या घटनेचा व्हिडिओ... राहुल गांधींसोबतही घडला होता असा प्रसंग... बघा त्याचा व्हिडिओ....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...