आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलयुगातील द्रौपदी: यामुळे ही महिला झाली पाच भावांची पत्नी; माहित नाही मुलाचा पिता कोण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेहरादून - महाभारतातील द्रौपदीचे पाच पती होते, हे तुम्हाला माहित असेल. मात्र आजच्या काळातही एक महिला अशी आहे जिचे पाच पती आहेत. तिला कलयुगातील द्रौपदी म्हटले जाते. या महिलेने पाच भावांसोबत लग्न केले असून ते पाच जण तिचे पती आहेत.
या महिलेवर अशी कोणती बळजबरी केली असेल किंवा तिची काय मजबूरी असेल ज्यामुळे तिला पाच भावांसोबत संसार करावा लागत आहे.
कलयुगातील द्रौपदीची कथा
- कलयुगातील या द्रौपदीची कथा तिच्या पतींसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने समोर आली आहे.
- सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये एक महिला पाच पुरुषांसोबत दिसते. तर तिच्या दुसऱ्या फोटोमध्ये तिच्या कडेवर एक बाळ देखील आहे.
- कलयुगातील या द्रौपदीचे नाव आहे राजो वर्मा. राजो तिच्या पाच पतींसह डेहरादून जवळील एका गावात राहाते.
प्राचीन परंपरेचे पालन
- पाच भावांसोबत लग्न करण्याची या कुटुंबातील परंपरा असल्याचे सांगितले जाते.
- मीडिया रिपोर्टनुसार, हे कुटुंब आपली प्राचीन परंपरा जपत असून त्यानुसारच त्यांनी राजोसोबत लग्न केले आहे.
- सात वर्षांपूर्वी राजोचे लग्न गुड्डू सोबत झाले होते. त्यानंतर कुटुंबाच्या परंपरेनुसार इतर चार भावांसोबतही तिचा हिंदू पद्धतीने विवाह झाला.
- या कुटुंबात ही परंपरा महाभारतात द्रौपदीने पाच भावांसोबत लग्न केल्यापासून सुरु झाल्याचे सांगितले जाते.
राजोच्या मुलाचा पिता कोण
- कलयुगातील या द्रौपदीने पाच भावांसोबत लग्न केले.
- पाच भावांची पत्नी असलेली राजो, प्रत्येक रात्री वेगवेगळ्या भावासोबत असते.
- या महिलेला जेव्हा मुलगा झाला तेव्हा तिलाही सांगता आले नाही की या मुलाचा खरा पिता कोण आहे.
पाच भाऊ एक पत्नीची हॅपी फॅमिली
- पाच भावांमध्ये राजो एकुलती एक पत्नी असली तरी भावांमध्ये कोणतेही वितुष्ट आलेले नाही.
- राजोसोबत तिचे पाचही पती आनंदाने राहातात.
- राजोला पाच पतींसोबत संसार करावा लागत आहे तर, तिच्या आईने तीन पुरुषांसोबत लग्न केले होते.
पुढील स्लाइमध्ये, इन्फोग्राफिक्समधून समजून घ्या का केले पाच भावांसोबत लग्न...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...