आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या तरुणीने दिले छेडछाडीला चोख उत्तर, पाहा कसे केले गुंडांचे हाल !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक दिवसांपासून तरुणीची छेड काढत होते हे गुंड. - Divya Marathi
अनेक दिवसांपासून तरुणीची छेड काढत होते हे गुंड.
बटाला (जालंधर) - छेड काढणाऱ्या गुंडांना एका तरुणीने रणरागिणीचा अवतार धारण करत चपलेने चांगलाच चोप दिला. एवढेच नाही तर त्यांच्या तोंडाला शेण फासून त्यांना पोलिसांच्या हवाली केले. शहर पोलिसांतील एसएचओ प्रभज्योत सिंह म्हणाले की, पीडित तरुणीने केलेल्या तक्रारीच्या आधारे दोन्ही बदमाशांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीने दोन्ही रोमियोंची बुटाने आणि हाताने जबरदस्त धुलाई केली.
 
असे आहे प्रकरण...
- सूत्रांनुसार, तरुणी विवाहिता असून ती आपल्या मुलाला स्कूटीवरून शाळेतून घ्यायला जाताना एक तरुण राबी आणि त्याचा मित्र तिची छेड काढतात.
- ते अश्लील गाणे गाऊन तिला नेहमी परेशान करतात.
- महिलेचा आरोप आहे की, दोघांनी तिचा हात पकडून तिला ओढून बळजबरी कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला.
- आरडाओरड केल्याने आसपासचे लोक तेथे जमले आणि त्यांचा आधार मिळत असल्याचे पाहून महिलेने दोन्ही रोडरोमियोंना मनसोक्त मारहाण केली.
 
गुन्हा दाखल करण्यात आला...
- तरुणीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून दोन्ही लोफर तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
- पीडित तरुणीच्या जबाबावरून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
- महिलेने या दोन्ही तरुणांची चपलेने पाठ मोकळी केली.
- सोबतच तिने त्यांच्या तोंडाला शेणही फासले आणि मग पोलिसांच्या हवाली केले.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आरोपींची धुलाई करताना तरुणी... 
बातम्या आणखी आहेत...