आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीला म्हणाली पत्नी- डोळे बंद करून चांगले ध्यान करा; मग प्रियकराने केले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नीने प्रियकरासह मिळून पतीचा खून केला. - Divya Marathi
पत्नीने प्रियकरासह मिळून पतीचा खून केला.

समस्तीपूर (बिहार) - येथे एका विवाहितेने कट करून आपल्या प्रियकरामार्फत पतीची हत्या केली. घटना बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील आहे. पोलिसांनी दिलीप पाठक हत्याकांडाचा खुलासा केला आहे. आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. 

 

प्रियकरासह मिळून पत्नीने रचला होता कट...
- पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 26 नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांनी गावकऱ्यांनी नदीकिनारी एक मृतदेह आढळल्याची माहिती दिली होती.
- दिलीपच्या खुनाचा कट त्याच्या पत्नीने- काजलने प्रियकरासह थंड डोक्याने रचला होता.
- एसपी दीपक रंजन म्हणाले की, दिलीपच्या दोन मुलांना शिकवायला लक्ष्मण कुमार यायचा.
- काजल जवळच्याच एका खासगी शाळेत शिकवत होती. याच शाळेत लक्ष्मणही मुलांना शिकवत होता. दोघांमध्ये येथेच मैत्री झाली आणि प्रेमप्रकरण सुरू झाले.
- दिलीपला जेव्हा काजल आणि लक्ष्मणच्या अवैध संबंधांबाबत माहिती मिळाली तेव्हा त्याने विरोध सुरू केला. यामुळे त्रस्त होऊन काजलने प्रियकर लक्ष्मणसह पतीचा काटा काढण्याचा कट रचला.

 

अशी केली हत्या...
- पोलिस सूत्रांनुसार, दिलीपची आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती. याचा फायदा उचलून त्याच्या पत्नीच्या प्रियकराने त्याला म्हटले की, रात्री उशिरा निर्मनुष्य जागी पूजा केल्याने पैसे मिळतात. 25 नोव्हेंबरच्या रात्री पैशांच्या लोभापायी दिलीप लक्ष्मणसह त्याच्या बाइकवरून नदीकिनारी गेला. येथे पूजेची सामग्री खरेदी केल्यावर रात्री अंधार होण्याची त्यांनी वाट पाहिली. यानंतर दोघेही दिलीपच्या पत्नीसह घाटावर पोहोचले.
- कटानुसार, काजलने आधी दिलीपला पूजा करायला लावली. पूजेदरम्यान पैसे मिळण्यासाठी चांगले डोळे मिटून ध्यान करा म्हणाली. दिलीपने डोळे बंद करून ध्यानमग्न होताच लक्ष्मणने बाइकमधून धारदार हत्यार आणले. त्याने पाठीमागून दिलीपच्या मानेवार जोरदार वार केला. मान कापल्याने जागेवरच दिलीपचा मृत्यू झाला.

 

2 महिन्यांत 1300 कॉल
- एसपी दीपक रंजन म्हणाले, आरोपी लक्ष्मण आणि दिलीपच्या पत्नीचे कॉल डिटेलवरून कळले की मागच्या दोन महिन्यांत लक्ष्मण आणि काजलमध्ये 1300 वेळा फोनवर बोलणे झाले. रात्रीच्या वेळी दोघांत 2 ते 3 तास बोलणे झाल्याचे रेकॉर्ड मिळाले आहे.
- याप्रकरणी दोघांना अटक केली असून त्यांना स्पीडी ट्रायलअंतर्गत शिक्षा दिली जाईल.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, घटनेशी संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...