आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman News In Marathi, Punam Saini, Rima Patel, Indian Coastal Force

अर्धे विश्‍व: सागरी सुरक्षेची जबाबदारी सांभाळणा-या त्या चारचौघी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोर्ट ब्लेअर - दिल्लीची पूनम सैनी, रीमा पटेल व कर्नालची अक्षी या भारतीय तटरक्षक दलाच्या असिस्टंट कमांडेंट आहेत. बंगालच्या खाडीतील हवाई सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी या तिघींवर आहे. हा सन्मान मिळवणा-या त्या पहिल्याच महिला आहेत. पोर्ट ब्लेअरवरून रोज उड्डाण घेणे, समुद्रातील संशयास्पद हालचालीची माहिती लष्कराला देणे हे त्यांचे काम.


तिघींनाही आपल्या जबाबदा-यांचा सार्थ अभिमान आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शस्त्रास्त्रांच्या तस्करीचा एक मोठा डाव हाणून पाडला. पूनम आपल्या नियमित उड्डाणावर असताना समुद्रात अचानक तिला एक जहाज दिसले. त्यावर भारतीय ध्वज वा नावही नव्हते. जहाजाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यानंतरही उत्तर आले नाही. अखेर सागरी सुरक्षादलाने जहाज ताब्यात घेतले तेव्हा त्यात प्रचंड प्रमाणात दारुगोळा आढळून आला. वैमानिक बनल्याच्या प्रश्नावर पूनम हसून म्हणाली, 2007 मध्ये 12 वी पास झाल्यानंतर आपणही मित्रांसारखे काही तरी खास करावे, अशी उर्मी मनात दाटून आली. तडक फिलिपिन्स गाठून तेथे सहा महिन्यांचे फ्लाइंग ट्रेनिंग घेतले. परतल्यानंतर पूनमला अनेक बड्या आंतररराष्ट्रीय विमान कंपन्यांनी ऑफर्स दिल्या. मात्र तिने निवडला नोकरीसोबत देशसेवेची संधी देणारा कोस्टगार्डचा पर्याय.


तटरक्षक दलात सुरुवातीचे वर्षभर ग्राउंड ड्यूटी करावी लागते. आज पूनमजवळ 200 तासांचा विमान उड्डाणाचा अनुभव आहे. सागरी सीमेच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात आलेली ती पहिली महिला ठरली आहे. तटरक्षकदलाच्या पहिल्या महिला वैमानिक मोनिका सेठ यांना पूनम आदर्श मानते. 1998 मध्ये महिलांसाठी तटरक्षक दलाचे दरवाजे खुले झाले होते.


पूनमला ऑल फिमेल पायलट क्रूमध्ये पाठवण्याचे श्रेय लेफ्टनंट कमांडर सुनीलकुमार यांना जाते. पहिल्याच दिवशी दोघी जेव्हा फ्लाइंगसाठी निघाले तेव्हा भयंकर पाऊस सुरू होता. कुणालाच माहीत नव्हते की दोघी महिला वैमानिक विमान उडवत आहेत. हवामान आणखी बिघडत असल्याने सुनीलकुमार यांचे टेन्शन आणखी वाढत होते. सरतेशेवटी दोघी यशस्वी उड्डाण करून परतल्या.