आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Woman Police Constable Gangraped By Dacoits In Jharkhand

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झारखंड : मृतदेह घेऊन जाणा-या पोलिस कर्मचा-यावर सामूहिक बलात्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील महिला छायाचित्रकराच्या बलात्काराचा निषेध महाराष्ट्रापासून दिल्ली पर्यंत सुरु आहे. त्याचवेळी देशभरातून अशा घटना समोर येत आहेत. झारखंडमध्ये तर एका महिला पोलिसावर सामूहिक बलात्कार झाला आहे. देशातील पोलिसच सुरक्षित नसतील तर, सामान्यांचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
(का वाढत आहेत बलात्काराच्या घटना)
झारखंडमधील लातेहार येथील महिला पोलिस नातेवाईकाचा मृतदेह रांचीहून गढवा येथे गाडीमध्ये घेऊन जात होत्या. लातेहार जवळील राष्ट्रीय महामार्ग 75 वर काही गुंडांनी गाडी अडवून महिलेला जवळच्या झाडीत नेले आणि तिच्यासोबत दुष्कर्म केले. पोलिसांनी शनिवारी या घटनेची माहिती दिली आहे. गुरुवारी ही घटना घडली असून, 36 तासांनंतरही आरोपी मोकाट आहेत. एफआयआर दाखल केल्यानंतर पोलिसांनी काही संशयीतांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे.

पीडित महिलेचे पती देखील पोलिस होते. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ते शहीद झाले होते. त्यानंतर महिलेला झारखंड पोलिसांत नोकरी देण्यात आली. महिला ज्या नातेवाईकाच मृतदेह घेऊन जात होती, त्याला देखील नक्षलवाद्यांनी मारले होते.

पोलिसांनी सांगितले, की सामुहिक बलात्कार करणारे आरोपी दरोडेखोर आहे. रस्त्याने जाणारी वाहने अडवून लुटमार करणे त्यांचा उद्योग आहे. सामूहिक बलात्काराची शिकार झालेल्या महिलेसोबतच्या तीन जणांना मारहाण करुन त्यांच्या कडील ऐवज त्यांनी लांबवला.