आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीने जुगारात पत्नीला ठेवले गहाण, जिंकणाऱ्या व्यक्तीने असे केले..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१५ वर्षांपूर्वी झाले होते अतीक-अंजुमनचे लग्न - Divya Marathi
१५ वर्षांपूर्वी झाले होते अतीक-अंजुमनचे लग्न
जोधपूर- शहरामध्ये राहणारे मोहम्मद अतीक यांची 29 वर्षाची पत्नी अंजुमन बानो हिने सर्वांसमोर पतीला तीन वेळेस घटस्फोट देण्यास विरोध केला आहे. तिच्या पतीने मोबाईलवर तीन वेळेस तलाक दिला असल्याचे तिने सांगितले मात्र तिला तो तलाक मेनी नाही असेही अंजुमन बानो म्हणाल्या. तसेच माध्यमांसमोर त्या म्हणाल्या 15 वर्षांपासून पतीचा अत्याचार सहन करत होती. पतीने तिला दोन वेळेस पत्त्यांमध्ये गहाण ठेवले आणि हरले सुद्धा होते. जिंकणाऱ्या व्यक्तीने बहीण म्हणून मानले आणि वाचली ईज्जत... 
 
- वकील रंजना शर्मासोबत कोर्टामधून बाहेर निघाल्यावर अंजुमन बानो यांनी मीडियाशी बोलतांना पतीवर अनेक आरोप लावले. हे आरोप फॅमिली कोर्टमध्ये सुद्धा सांगितले होते. 
- अंजुमन म्हणाल्या 6 ऑक्टोंबर 2001 मध्ये मो. अतीकसोबत लग्न झाले. तिच्या पतीने वडिलोपार्जित व्यवसायसोडून घरामध्ये जुगार अड्डा चालू केला. 
- घरामध्ये एकवर्षभर चालत असलेल्या जुगार अड्ड्याची गोष्ट सांगितली नाही. मात्र जेव्हा मला माहिती झाले त्यावेळेस त्याच्या वागण्यामध्ये बदल  झाला, असेही बानो म्हणाल्या. 
- तिचा पती घरामध्ये जुगार खेळण्यासाठी येणाऱ्या लोकांना दारू पाज म्हणायचा आणि घाणेरडे लोकांसोबत जाण्यासाठी भाग पाडत होता. 

- त्याला ज्या-ज्यावेळेस तिने विरोध केला त्यावेळेस तिच्या अंगावर गरम चहा टाकायचा तर कधी कधी शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर किंवा हात-पायांवर सिगरेटचे चटके लावायचा. 

- एका वेळेस पोलीस ठाण्यात तक्रार केली असता त्याला याची माहिती मिळाली आणि त्याने मला मारण्यास सुरुवात केली. या गोष्टीमुळे जानेवारी 2016 मध्ये हुंड्यासाठी छळ करण्याची तक्रार केली. 
- महिलेच्या माहितीनुसार लग्नाच्या आठ वर्षानंतर पतीने तिला दोन वेळेस जुगारामध्ये गहाण ठेवले आणि हरला पण होता. जिंकणारा व्यक्ती हा मुस्लिमच होता. आणि तो घरी घ्यायला गेला असता. धर्माच्या आधारे त्याने तिला बहीण मानले. आणि दुसऱ्या युवकाला समजावून सांगितले. 
- अंजुमनचा पती मो. अतीक याने मान्य केले की त्याने 8 दिवसापूर्वी फोन केला होता. की तीन वेळेस तलाक दिला आहे. कोर्टाने दोन्ही पक्षाची ऐकल्यावर येणाऱ्या 24 ऑगस्टला पुढचा निर्णय घेतला जाईल असे सांगितले. 
 
जुगार खेळतो, मात्र पत्नीने लावलेला आरोप हा खोटा आहे: मो. अतीक 
इकडे, अंजुमनचा पती मो. अतीकचे म्हणणे आहे, मी जुगार नक्की खेळतो मात्र घरी कधी असे काम केले नाही. आणि एक पती आपल्या पत्नीला कसे गहाण ठेऊ शकतो? जुगार खेळण्यासाठी येणाऱ्या लोकांना दारू पाज म्हणायचा आणि घाणेरडे लोकांसोबत जाण्यासाठी भाग पाडण्याचा आरोप खोटा आहे. ती मला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. तिला समजावण्याचे खूप प्रयत्न केले, पण जेव्हा कोर्टाची नोटीस आली त्यावेळेस मोबाईलवर तलाक देऊन टाकला. 

जुगारी पती असल्यामुळे लोक घर भाड्यानेसुद्धा देत नव्हते : अंजुमन 
अंजुमन सांगितले की तिचा पती घरामध्ये जुगार खेळत असायचा. त्यामुळे सासऱ्याने घराबाहेर काढले. काही दिवस भाड्याच्या घरात पतीसोबत राहिली. मात्र जेव्हा परिसरातील लोकांना माहिती झाल्यामुळे कोणीच भाड्याने घर द्यायला तयार नव्हते. 
 
बातम्या आणखी आहेत...