आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेस पळवून नेऊन केला बलात्कार; दुष्कर्मानंतर शरिरात लोखंडी गज खुपसून खून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक- हरियाणातील राेहतक येथे ११ मे रोजी एका महिलेचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह सापडला होता. ९ मे रोजी अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून नंतर हत्या करण्यात आल्याची बाब शवविच्छेदनानंतर स्पष्ट झाली.  या महिलेच्या शरीरात दुष्कर्मानंतर लोखंडी गज किंवा अणकुचीदार वस्तू खुपसण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणात सुमीत व त्याचा साथीदार विकास यास अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिपतच्या सुमीत याने ९ मे रोजी धावत्या कारमध्ये त्या घटस्फोटित महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर रोहतकमधील आयएमटीमागे असलेल्या पार्श्वनाथ कॉलनीत तिला नेण्यात आले. त्यानंतर आधीच ठरल्याप्रमाणे सुमीतने त्याचा साथीदार विकासच्या मदतीने डोक्यात दगड घालून तिची हत्या केली.  त्यानंतर ते दोघेही तेथून फरार झाले. 
बातम्या आणखी आहेत...