आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Woman Raped Like Nirbhaya In Rohtak News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बलात्कार पीडितेच्या शरीरात सापडले टोकदार दगड, खिळे आणि कंडोम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक- हरियाणातील रोहतकमधील बलात्कार आणि हत्याकांडाने पुन्हा एकदा दिल्लीतील निर्भयाप्रकरणाच्या आठवणी ताज्या करून दिल्या आहेत. एका 28 वर्षीय नेपाळी तरुणीसोबत नराधमांनी हैवानियतेच्या सर्व सीमा ओलांडल्या होत्या. नराधमांनी तरुणीवर बलात्कार तर केलाच याशिवाय तिची हत्याकरण्यापूर्वी तिच्यावर प्रचंड अत्याचार केले असल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे.

पीडितेच्या गुप्तांगात 16 CM लांबीचे टोकदार दगड, खिळे, चादरीचे तुकडे आणि कंडोम सापडल्याचे शवविच्छेद करणार्‍या डॉक्टरांनी सांगित्रले. शुक्रवारी डॉक्टर आणि पोलिसांनी पत्रकार परिषदेत या बलात्कार आणि हत्याकांडाविषयी धक्कादायक माहिती दिली.
पीडितेच्या गुप्तांगाला गंभीर दुखापत झाली होती. यावरून नराधमांनी तिच्या गुप्तांगात लोखंडी रॉड टाकला असावा, अशी शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.
काय आहे प्रकरण..
पीडिता नेपाळ येथील रहिवास असून ती मानसिक रुग्ण होती. रोहतकमधील चिन्योट कॉलनीत तिच्या मोठ्या बहिणीकडे उपचार घेण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी आली होती. मात्र, गेल्या एक फेब्रुवारीला पीडिता अचानक बेपत्ता झाली होती. तिच्या मोठ्या बहिणीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दरम्यान, अकबरपूर भागात बुधवारी (4 फेब्रुवारी) पीडितेचा मृतदेह नग्नावस्थेत आढळून आला होता. मृतदेहाचा वरील भाग प्राण्यांनी ओरबळला होता. याप्रकरणाचा तपास पोलिसांची 'स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम'ची (एसआयटी) करत आहे.
नराधमाची माहिती देणार्‍यास एक लाखाचे बक्षिस...
नेपाळी तरुणीवर बलात्कार करून तिची हत्याकांडातील आरोपींवर एक लाख रुपयांचे बक्षिस ठेवण्यात आले आहे. नराधमांची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी जनतेला केले आहे.

दरम्यान, शुक्रवारी पीडितेच्या नातेवाइकांनी रोहतकमध्ये धरणे आंदोलन केले.