आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगळुरु घटनेपेक्षाची भयंकर, Rape नंतर रात्रभर महिला पोलिस ठाण्यात, मुलाचा तडफडून मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हमीरपूर (उत्तर प्रदेश)- येथील एक महिलेसोबत जे काही घडले ते बंगळुरुतील घटनेपेक्षाही भयंकर आहे. फरक एवढाच आहे, की ही महिला ग्रामिण भागात राहाते. त्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नाही. गावठी बंदुकीचा धाक दाखवून गावातील एका गुंडाने या महिलेवर बलात्कार केला. तिचे सगळे कपडे घेऊन तो पळून गेला. तिला अगदी विवस्र अवस्थेत सोडून तेथून पळ काढला. पीडित महिलेने पोलिस तक्रार केली तर तिला रात्रभर पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. या दरम्यान तिच्या तान्हुल्याचा भुकेने मृत्यू झाला.
 
बलात्कार केल्यानंतर कपडे घेऊन पळाला आरोपी
- 1 जानेवारीच्या रात्री पीडित महिला रात्रीच्या वेळी शौचसाठी गेली होती.
- तेथून परत येताना गावातील गुंड शैलेंद्र पालने तिला गावठी बंदुकीचा धाक दाखवला.
- तिच्यावर पाशवी बलात्कार केला. यावेळी तिने याची पोलिस तक्रार करण्याची धमकी दिली.
- त्यानंतर तो तिचे कपडे घालून पळून गेला. बराच वेळ ती विवस्र शेतात पडून होती.
- अजूनही सून घरी आली नसल्याने सासू-सासरे टॉर्च घेऊन शेतात आले. त्यावेळी ती त्यांना तेथे दिसली.
- त्यांनी शॉल देवून तिला घरी आणले. त्यानंतर ती पोलिस ठाण्यात गेली. तिने तक्रार नोंदविण्याची पोलिसांना विनंती केली.
- पोलिसांनी तिला चक्क रात्रभर पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. सकाळीच ती घरी जाऊ शकली.
- घरी माझे बाळ माझी वाट बघत असेल असे वारंवार सांगूनही तिला पोलिसांनी जाऊ दिले नाही.
- या दरम्यान भुकेने व्याकूळ बाळाचा मृत्यू झाला. बलात्काराचा धक्का पचवूनही या महिलेला मुलाच्या मृत्यूच्या दुःखाला सामोरे जावे लागले.
 
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेशी संबंधित फोटो...
बातम्या आणखी आहेत...