आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: पोलीस ठाण्यातच गोळ्या घालून महिलेचा खून, संतप्तत जमावाने आरोपीला चोपले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपीला चोप देताना जमाव - Divya Marathi
आरोपीला चोप देताना जमाव
मॅनपुरी - यूपीतील मॅनपूरी येथील पोलीस ठाण्यात संपत्तीवरून वाद सुरू असताना महिलेला गोळ्या घालून ठार मारण्याचा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. घटनास्थळी संतप्त झालेल्या जमावाने आरोपीला तेथेच पकडून बेदम चोप दिला आणि पोलीस ठाण्यात तोडफोड सुद्धा केली. लोकांचा राग पाहता एकही पोलीस कर्मचारी त्यांना अडवण्यासाठी पुढे आला नाही.
 
संपत्तीचा होता वाद
- पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मॅनपुरीच्या आगरा गेट पोलीस ठाण्यासमोर कोट्यवधी रुपयांची जमीन आहे. याच 
जमीनवरून फातेमा आणि गोला बाजार परिसरात राहणाऱ्या हाजी खान यांच्यात वाद सुरू होता. 
- फातेमाचा मुलगा वसीम याचे त्याच वादग्रस्त जमीनीवर भाड्याने राहणाऱ्या अनीसा (45) हिच्याशी भांडण झाले.
- प्रकरण एवढे वाढले, की दोन्ही पक्षांना पोलीस ठाणे गाठावे लागले. याचवेळी दोन्ही पक्षांचा वाद टोकाला गेला. 
- यावेळी लोक काही लोक पोलीस ठाण्यात घुसले आणि एकाने अनीसा हिला जागीच गोळ्या घालून ठार मारले. 
 
पोलिसांसमक्ष आरोपीला बेदम मारहाण
अनीसा हिला गोळ्या घालताच तिच्या कुटुंबातील सदस्यांचे माथे फिरले. त्यांनी दुसऱ्या पक्षाच्या लोकांवर हल्ला केला. यात वसीम, त्याची बहिण आणि आई फातेमा हिला बेदम चोप देण्यात आला. तसेच ठाण्यात तोडफोड सुद्धा केली. संतप्त जमावाला अडवण्यासाठी एकही पोलीस कर्मचारी पुढे आला नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सुनील सक्सेना यांनी घटनास्थळ गाठले. तसेच मुख्य आरोपी वसीम, त्याची बहिण आणि आई फातेमा हिला अटक करण्यात आली. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या 
Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर 
लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...