आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LOVE अफेअरनंतर लग्न, 8 महिन्यांपूर्वी पती सोडून गेला, त्याच्या घरासमोर पत्नीचे धरणे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोकरीचे निमीत्त करुन पतीने ज्योतीला माहेरी सोडले आणि परत घ्यायलाच आला नाही. - Divya Marathi
नोकरीचे निमीत्त करुन पतीने ज्योतीला माहेरी सोडले आणि परत घ्यायलाच आला नाही.
फतेहाबाद (हरियाणा) - फतेहाबाद जिल्ह्यातील रतिया भागात एक महिला आपल्या पतीच्या घरासमोर धरणे आंदोलन करत आहे. आपला पती आपल्याला परत मिळावा, यासाठी गेल्या 11 दिवसांपासून सुरु असलेले ज्योतीचे धरणे आंदोलन आता सोशल मीडियावरुनही सुरु झाले आहे.

कशी झाली होती भेट, केव्हा झाले लग्न
- ज्योती उर्फ अलीशाने सांगितले की त्यांची पहिली भेट 2010 मध्ये फरीदाबाद येथे झाली होती. तिथे ती मावशीच्या घरी राहून जर्नालिझमचा कोर्स करत होती.
- तिने सांगितले, की शेजारी राहात असलेला साहिल इंजिनिअरिंग करत होता. तो तिथे पीजी म्हणून राहात होता.
- शेजारी राहात असल्यामुळे त्यांची ओळख झाली आणि भेटीगाठी वाढू लागल्या. दोघे फोनवर एकमेकांसोबत तासन् तास बोलत होते.
- याच दरम्यान ज्योती आणि साहिल यांच्यात काही कारणांमुळे भांडण झाले आणि ज्योतीने साहिलला तिच्यापासून दूर राहाण्यास सांगितले. मात्र साहिलने तिचे काही एक एकले नाही.
- अखेर दोन्ही कुटुंबांच्या संमतीने ज्योती आणि साहिल यांनी 2012 मध्ये लग्न केले.
बाबा राम रहिम यांच्याकडे मदतीची मागणी
- ज्योतीचे म्हणणे आहे, की 2012 मध्ये लग्न झाल्यानंतर ती साहिल सोबत त्याच्या कुटुंबियांसह त्याच्या घरी राहात होती. मागील वर्षी डिसेंबरमध्ये साहिलने नोकरीच्या निमीत्ताने बाहेर जात आहे, असे सांगितले आणि मला माहेरी - दिल्लीला सोडून दिले.
- त्यानंतर मला घेण्यासाठी ना साहिल आला, ना त्याचे आई-वडील. सासरच्या मंडळींनी मला वाऱ्यावर सोडले. मात्र मी पतीला सोडणार, ना सासरच्या लोकांना. कारण लग्नानंतर आता हेच माझे घर आहे.
- ज्या व्यक्तीसोबत माझे लग्न झाले त्याच्याच घरातून आता माझी अंत्ययात्रा निघेल, असा निश्चय ज्योतीने व्यक्त केला आहे.
- साहिल मिळावा यासाठी ज्योती सासर हांसपूर येथील त्याच्या घराबाहेर एक सतरंजी अंथरून गेल्या 11 दिवसांपासून राहात आहे, आंदोलन करत आहे. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आपल्याला सासरच्या लोकांनी घरात घ्यावे यासाठी विनंती केली आहे.
- डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमित सिंग राम रहिम यांच्याकडेही तिने मदतीची याचना केली आहे.
- ज्योतीचे म्हणणे आहे की ती स्वतः आणि तिच्या सासरचे लोकही बाबा राम रहिम यांचे भक्त आहेत. त्यामुळे आता बाबा राम रहिम यांनीच आमच्यात सलोनामा घडवून आणावा. तोच शेवटचा पर्याय उरला असल्याचे तिने सांगितले आहे.

सासरचे लोक घराला कुलूप लावून गायब
- ज्योतीने घराबाहेर धरणे आंदोलन सुरु केल्यापासून तिच्या सासरचे लोक घराला बाहेरुन कुलून लावून गायब झाले आहेत.
- ज्योतीने त्यांच्या विरोधात पोलिसात जाण्यास नकार दिला आहे. तिचे म्हणणे आहे की साहिल सोबत माझे लग्न झाले आणि आता यापुढील आयुष्यही त्याच्यासोबतच घालवायचे आहे.
- 4 ऑगस्टला साहिलचा वाढदिवस असून तो साजरा करण्याचाही ज्योतीचा मनोदय आहे. यामुळे तरी त्याचे मन बदलेल आणि तो मला घऱात घेईल अशी भाबडी आशा तिला आहे.

अन्नत्यागही सुरु
- 11 दिवसांपासून रस्त्यावर बसून धरणे आंदोलन करणाऱ्या ज्योतीने आता अन्न-पाण्याचाही त्याग केला आहे.
- पाऊस-थंडीत बसल्यामुळे तिची प्रकृती बिघडत चालली आहे. मात्र दवाखान्यात आणि पोलिसात जाण्यास तिचा स्पष्ट नकार आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा,
> ज्योतीच्या सुखी संसाराचे फोटो
> वाचा, ज्योतीच्याच भाषेत तिचे सोशल मीडियावरुन केलेले आवाहन
> 11 दिवसांत कशी बदलली ज्योती...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तरURL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...