आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Stripped Naked In Jk Accused Include Army Jawan. Latest News In Marathi

सगळ्यांसमोर महिलेला केले विवस्त्र, व्हिडिओ बनवून इंटरनेटवर केला अपलोड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू- जम्मू-कश्मीरमध्ये काही नराधमांनी एका महिलेला सगळ्यांसमोर विवस्त्र करून तिचा व्हिडिओ बनवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकेच नव्हे तर नराधमांनी पीडितेचा व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. दोन आरोप फरार आहेत. आरोपींमध्ये लष्करातील एका जवान असल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांनी अनुसार, उधमपुरमधील जगानू भागात शनिवारी ही घटना घडली. महिला बाइकवरून जात असताना पाच नराधमांनी तिला रोखले. तिची छेड काढली. सगळ्यांसमोर तिला विवस्त्र करून मोबाइलमध्ये तिचा व्हिडिओ बनवून इंटरनेटवर अपलोड केला. सूचना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून दोघांचा शोध घेतला जात आहे.