आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेने 3 मुलांसह घेतला गळफास, चिमुकला म्हणाला, पप्पा आईला रोज मारत होते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉक्टरच्या पत्नीने 3 मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न केला. - Divya Marathi
डॉक्टरच्या पत्नीने 3 मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न केला.
गोरखपूर - यूपीच्या गोरखपूरमध्ये गुरुवारी एका डॉक्टरच्या पत्नीने आपल्या 3 मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत महिलासहित त्याच्या 1 मुलीचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, शेजाऱ्याच्या मदतीने पोलिसांना 2 मुलांना वाचवण्यात यश आले आहे. फॉरेन्सिक टीम आणि एसपी सिटी यांनी घटनास्थळी तपासणी केली. मृत महिलेचा डॉक्टर पतीही या वेळी उपस्थित होता. या वेळी एका मुलाने आपल्या वडिलांवर आरोप केला की, 'पप्पा मम्मीला रोज मारत होते.'
 
असे आहे प्रकरण...
- ही घटना शहापूरच्या शक्तीनगर कॉलनीतील आहे. येथे सुभाष प्रजापती हे डेन्टिस्ट आहेत. त्यांचे स्वत:चे खासगी क्लिनिकही आहे. त्यांचे 13 वर्षांपूर्वी मृत शोभादेवीशी लग्न झाले. त्यांना 3 मुले होती. यात मोठी मुलगी अनन्या (6), छोटा मुलगा अथर्व (5) आणि सर्वात लहान आराध्या (3) होती.
- गुरुवारी संध्याकाळी शोभादेवीने आपल्या दोन मुली आणि एका मुलासोबत फासावर लटकून आत्महत्येचा प्रयत्न केला.
- या दुर्दैवी घटनेत तिच्या मोठ्या मुलीचा मृत्यू झाला. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शेजाऱ्यांच्या मदतीने 2 मुलांचे प्राण वाचवले.
- मानसिक तणावात येऊन महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. तथापि, महिलेचा पती म्हणाला की, तो क्लिनिकवर गेला होता. तिथे माहिती मिळाल्याने लगेच परत आला. त्याने घरगुती वादाला नाकारत आमच्यात कोणताही वाद नसल्याचे सांगत पत्नीशी चांगले संबंध असल्याचे म्हणाला.
 
काय म्हणतात पोलिस?
- एसपी सिटी विनय सिंह म्हणाले, मुलाकडे चौकशी केली असता मृत महिलेचा नवरा तिला रोज मारहाण करत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या मृतदेहांचे पोस्टमॉर्टम केले जाईल. सर्व पैलूंचा बारकाईने तपास करून कारवाई करण्यात येईल.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या घटनेचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...