वाराणसी- बीएचयूच्या ट्रॉमा सेंटरमध्ये एक महिला जिवंतपणी मरण यातना भोगते आहे. पेनकिलरच्या मदतीने सध्या तरी तिला जगवले जात आहे. तिनेे एक पाय गमावला आहे. तिच्या संंपूर्ण शरीरावर डॉक्टरांनी टाके घातले आहे. पण, इंजेक्शनचा असर कमी होताच ती शुुद्धीवर येेते. जोरजोरात वेदनेने ओरडते. अधून मधून संंतापतेही. एका पायावर उभी राहून ती बेडवरून उठूून पळण्याचा प्रयत्न करते आणि ओरडतच म्हणते, 'त्या दोघांना जिवंत सोडणार नाही.'
कोण आहे ही महिला, नेमकेे काय झाले आहे तिच्यासोबत...?
- ही घटना 18 सप्टेंबरची आहे. ही महिला उत्तर प्रदेशतील जौनपूर येथून ट्रेनने माहेरी जायला निघाली होती.
- चुकून ती मऊ येथे पोहोचली. ती शेवटच्या ट्रेनच्या डब्यात बसली होती.
- ट्रेनमध्ये शेंगा आणि चाट विकणारे तिघे आले डब्यात आले. तेव्हा डब्यात एकट्या पीडितेशिवाय एकही प्रवासी नव्हता. त्याचा फायदा घेत तिघांनी तिच्यावर सामूहीक बलात्कार केला.
- नंतर तिघांनी तिला धावत्या ट्रेनमधून खाली फेकले. तिचा पाय रेल्वे खाली आल्याने कापला गेला.
- ती दूर शेतात फेकली गेली.
- दुसर्या दिवशी सकाळी शेतात काम करणार्या शेतकर्यांना तिचा आवाज आला.
- तिला तातडीने मऊ येथील हॉस्पिटलमध्ये हलवले.
- मऊ येथे तिची प्रकृती जास्तच खालावली. तिला वाराणसीतील बीएचयू ट्रॉमा सेंटरमध्ये हलवले.
पुढील स्लाइडवर वाचा, महिलाला भेटण्याची कोणालाच नाही परवानगी... वॉर्डबाहेर जीआरपी दिवस रात्र पहारा... रेल्वेचे अधिकारी आणि जवानांनी 5 यूनिट रक्त...