आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेत दुष्कर्म करणाऱ्यांविरुद्ध लढली, पाय गमावले, शुद्ध आल्यावर म्हणाली- बरी होताच त्यांना मारून टाकेन!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणशीच्या ट्रॉमा सेंटरमधून उपमिता वाजपेयी
बीएचयूच्या ट्रॉमा सेंटरमध्ये ती बेशुद्ध पडली आहे. वेदना शमवणाऱ्या इंजेक्शनच्या मदतीने. इंजेक्शनचा परिणाम उतरला की कण्हत राहते. मग अचानक तिच्या अंगात प्रचंड राग चढतो. आणि आपल्या एका पायाच्या मदतीने रुग्णालयातील बेडवरून पळून जाण्याचा ती प्रयत्न करते. ओरडते आणि म्हणते मी जरा ठीक होऊ दे त्या दोघा पुरुषांना मारूनच टाकेन. बस फक्त ते एकदा माझ्यासमोर यावेत.

१८ सप्टेंबरची ही गोष्ट आहे. रात्री ती माहेरातून सासरी जौनपूरला परतत होती. चुकून ती मागच्या डब्यांमध्ये गेली. रेल्वेत ती शेवटच्या डब्यात होती. तेव्हा रेल्वे जवळपास रिकामी झाली होती. तीन माणसे जी बहुधा रेल्वेत शेंगदाणे आणि चाट विकत होती तिच्या जवळ आली आणि तिला ढकलले. ती ओरडू लागली. ती पळत रेल्वेच्या दरवाजापर्यंत आली तेव्हा त्यातील दोघांनी तिला रेल्वे रुळावर फेकून दिले. नेमके तिचे पाय रेल्वेखाली आले. ती रेल्वे रुळापासून काही मीटर दूर शेतात काम करणाऱ्या मजुरांना पडलेल्या अवस्थेत मिळाली.

कोणालाच माहीत नव्हते की ती इथे कशी पोहोचली असेल. तिला जेव्हा जेव्हा शुद्ध येत असे तेव्हा ती त्वेषाने ओरडत असे मुसमुसत काही गोष्टी बोलू लागते. लोकांनी पाहिले आणि तिला रुग्णालयात मऊ येथील रुग्णालयात जेव्हा तिची परिस्थिती बिघडू लागली तेव्हा तिला वाराणसीच्या बीएचयू ट्रॉमा सेंटर येथे हलविले. आम्हाला बीएचयू रुग्णालयाच्या बाहेर तिचा पती भेटला. दुपार होऊन गेली होती. पण त्याने तोपर्यंत त्याने खाल्लेदेखील नव्हते. विचारल्यावर म्हणतो, जेवढे पैसे होते ते दोन दिवसांतच संपले. तो आपल्या चार मुलांचा फोटो आपल्या लहानशा फोनमधून दाखवू लागला, म्हणाला मी इथे भुकेला आहे काही फरक नाही पडत; पण काय माहीत माझ्या मुलांचं गावाकडे काय होत असेल. वॉर्डाच्या बाहेर जीआरपीच्या जवानांचा दिवस-रात्र पहारा असतो. तिला भेटण्याची परवानगी कुणालाच नाही.

मोठ्या मुश्किलीने लपत-छपत आम्ही तिच्या खोलीत कसेबसे पोहोचले. तेव्हा दिसले ती तर जणू शुद्ध हरपल्यासारखी, जीव नसल्यासारखी पडून होती. शरीरातील कुठलाही भाग असा नव्हता की जिथे टाके लागले नव्हते. तिचा एक पाय गुडघ्याच्याखाली शस्त्रक्रिया करून कापून काढला होता. डॉक्टर सांगतात की, इन्फेक्शन एवढे वाढले होते की जिवालाच धोका होता. खूप रक्त वाहिले होते. रेल्वेचे अधिकारी आणि जवानांनी ५ युनिट रक्त दिले तेव्हा कुठे तिचे शरीर शस्त्रक्रिया करण्याच्या योग्यतेचे झाले. पोलिस तिचा जबाब घेण्यास आले तेव्हा त्या पोलिसांना पाहूनदेखील ती ओरडू लागली. कोणीही पुरुष तिच्या बेड जवळ गेला तरीही ती घाबरुन किंचाळू लागते. पहिल्यांदा शुध्द आली तेव्हा ती माझ्या शरीराला स्पर्श करत आहेत मी त्यांना मना केले की माझी इज्जत लुटु नका.

ते त्यांनी मानले नाही आणि मला रेल्वेतून फेकुंन दिले. पोलीसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तरीही यातील मुख्य आरोपी फरारच आहे. महीलेचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. ज्याचा अहवाल अजून तरी आलेला नाही.
बातम्या आणखी आहेत...