आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यरात्री विवाहितेने वडिलांना पाठवला मेसेज; आता बस्‍स, सहन करू शकत नाही!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालंधर- एका विवाहितेने मध्यरात्री विष प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने वडिलांना मेसेज पाठवला होता. गुरजीत असे विवाहितेचे नाव आहे. त्यात तिने लिहिले होते की, सासू हरदीप कौर हिच्या छळाला ती कंटाळली आहे. त्यामुळे इतके टोकाचे पाऊल तिने उचलले आहे.

रात्रीच मेसेज वाचला असता तर कदाचित वाचली असती कन्या...
- गुरजीतची तब्बेत बिघडल्यानंतर तिने विष प्राशन केल्याचे तिच्या सासू-सासर्‍यांना समजले. तिला त्यांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवले. पण, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
- गुरजीतचे व‍डील गुरचरण सिंग यांनी सांगितले की, मोबाइलवरील मेसेज रात्रीच वाचला असला तर कन्येला वाचवता आले असते.
- सासूच्या छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे गुरजीत हिने वडिलांना पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटले होते.
- आत्महत्येस सासू हरदीप कौर जबाबदार असल्याचेही गुरजीतने मेसेजमध्ये म्हटले आहे.
- पोलिसांनी गुरजीतची सासू हरदीप कौर आणि सासरे हरजिंदर सिंगला अटक केले आहे. तसेच पती लखविंदर सिंगसह सासू-सासर्‍याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गुरजीत कौरचा सुसाइड मेसेज...
- गुरजीत कौर हिने आत्महत्या करण्यापूर्वी वडिलांना मोबाइलवर 'सुसाइड मेजेस' पाठवला होता. 'डॅडीजी, मी सासूच्या छळाला कंटाळली आहे. आता माझ्याकडून सहन होत नाही. मी माझा जीवनप्रवास इथेच संपवत आहे. माझ्या आत्महत्येस सासू हरदीप कौर जबाबदार असेल.'
- गुरचरण सिंग यांनी सांगितले की, 'गुरजीत हिने रात्री 11 वाजून 05 मिनिटाला मेसेज पाठवला. पण, रात्री मेसेज वाचता आला नाही. रात्रीच मेसेज वाचला असता तर कन्येचा जीव वाचला असता.'

हुंड्यासाठी करत होते मुलीचा छळ...
- गुरचरण सिंग यांनी सांगितले की, गुरजीत कौर आणि लखविंदरचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला होता.
- पती लखविंदर सिंग हे दुबईत मॅकॅनिक म्हणून काम करतात.
- विवाह झाल्यानंतर काही महिन्यातच तिचे सासरचे लोक हुंड्यासाठी गुरजीतचा छळ करत होते, असे आरोप गुरचरण यांनी केला आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, गुरजीतने वडिलांना मोबाइलवर पाठवलेला 'सुसाइड मेजेस'......
बातम्या आणखी आहेत...