आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेठीत अंगणवाडीच्या महिलांची राहुल यांच्यासमोर निदर्शने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेठी- राहुल गांधी यांना आपल्या लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी विरोधाचा सामना करावा लागला. एका बैठकीनंतर राहुल लखनऊकडे जात असताना अंगणवाडीच्या सुमारे २०० महिलांनी त्यांचा ताफा रोखला राहुल मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.

राहुलला भेटण्याची इच्छा आहे. परंतु पोलिसांनी त्यांना अडवले होते. त्यावरून महिला नाराज झाल्या होत्या. नाराज महिलांनी राहुल गांधी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. त्यांच्या कारलाही घेराव दिला. पंधरा मिनिटे पोलिस महिला यांच्यात शाब्दिक चकमक सुरू होती. अखेर राहुल कारमधून बाहेर आले त्यांनी महिलांकडून निवेदन घेतले. त्यानंतर ते कारमध्ये बसून रवाना झाले. राज्याचे कर्मचारी म्हणून दर्जा मिळावा. वेतन १५ हजार रुपये मिळावे, अशा मागणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...