आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काठ्या-दांड्यांनी दारूड्यांना दिला चोप; दारूडे पळाले शेतात तर काही पडले नाल्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दारुड्यांना चोप देताना महिला)
राजगंज/जमशेदपूर - दारूबंदी मोहीमेंतर्गत महिलांनी शनिवारी राजगंज येथील माडी कोठारामध्ये असलेल्या भट्टीतील माडी तसेच दारूच्या दुकानाची तोडफोड केली. एवढेच नव्हे तर दारूड्यांना चांगलाच चोप देत हजारो लिटर माडी आणि महूआ दारू फेकून दिली. घटनास्थळावरून महिलांनी गॅलन, डेगची आणि दारू बनवण्याची भांडी जप्त केली. हे सर्व जप्त केलेले सामान घेऊन महिलांनी पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केले. यानंतर या महिलांनी पोलिसांना जप्त केलेले सामान दिले तसेच अवैध दारू बनवणार्‍या आणि विक्री करणार्‍या भट्टी तसेच दुकान बंद करावे अशी मागणी केली. ठानेदार राजदेव शर्मा यांनी आपण हे दुकान व भट्टी बंद करू असे आश्वासन दिल्यानंतर या महिलांनी हे आंदोलन मागे घेतले.
दारूड्यांना मारझोड
शेकडो महिलांनी धावाचिता येथून मोर्चा काढला. हा मोर्चा नंतर राजगंज येथील भट्टीवर पोहोचला. या सर्व महिलांच्या हातात काठ्या होत्या. महिलांनी या आठवडी भट्टीमध्ये असलेल्या माडीच्या गोदामावर हल्ला केला तसेच दुकानदारांना फटके देण्यास सुरूवात केली. यामुळे परिसरात धावपळ सुरू झाली. तेथे बसलेले दारूडे शेतात पळू लागले, तर काही नाल्यात पडले. सर्व महिलांनी हा दारूचा अड्डा पूर्णपणे नष्ट केला. तसेच दुकानदारांना चांगला चोप दिला.
या सर्व घटनेची छायाचित्र खास तुमच्यासाठी....