गुणा- येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ४ महिलांनी एका वकिलांची चपलेने धुलाई केली. त्याने या महिलांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न केला पण त्याला पुन्हा धरले. वकिलांचा मारहाणीत शर्टही फाटला. एवढे होऊनही महिलांचा राग शांत झाला नाही. अखेरीस तो वकील मंदिरात जाऊन लपला, त्यामुळे कसाबसा बचावला.
पैसे घेऊनही त्याने या महिलांचे उत्पन्न तसेच जात प्रमाणपत्रे तयार केलेली नव्हती. त्याला विचारणा केल्यानंतर बायको माहेरी गेली आहे, घरी या, असे निर्लज्ज विधान त्याने केले. त्यामुळे या महिलांचा राग अनावर झाला होता. वकिलांनी आरोप फेटाळून लावले.