आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बकरी मेली-म्हैस आजारी पडली-कोणाचा मृत्यू झाला, या महिलांना डायन ठरवून वाचा कसे छळले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भीलवाडा येथली सेमलाट गावातील पारसीदेवी. - Divya Marathi
भीलवाडा येथली सेमलाट गावातील पारसीदेवी.
जयपूर - गावात कोणाची बकरी मेली, म्हैस आजारी असली, कोणाच्या मुलाला काही झाले किंवा एखाद्याचा मृत्यू झाला. या सर्वघटना वेगवेगळ्या आहेत, मात्र या प्रत्येक घटनेचा जाब कोणत्या ना कोणत्या महिलेला द्यावा लागतो. या घटनांसाठी त्या महिलांना जबाबदार धऱले जाते.
राजस्थानमध्ये कडक कायदा असला तरीही दरवर्षी डझनभर महिलांना डायन ठरवून गावकऱ्यांच्या अत्याचाराचा सामना करावा लागतो. अंधश्रद्धेतून एखाद्या महिलेला डायन ठरवून तिची गावातून नग्न धिंड काढणे, मुंडन करणे, आगीवरुन चालायला लावणे, अमानुष मारहाण करुन अर्धमेली करणे असे अनेक शारीरिक अत्याचार आणि यातना दिल्या जातात. दैनिक भास्करने राज्यातील तीन जिल्ह्यामध्ये अशा अत्याचाराच्या बळी ठरलेल्या महिलांच्या - मानुसकिला काळिमा फासणारा कथा ऐकल्या. भारतीय स्वातंत्र्याला सत्तर वर्षे पूर्ण होत असताना आजही देशात अशा अंधश्रद्धा आहेत आणि याच्या बळी फक्त महिलाच ठरतात.

बकरी मेली म्हणून पारसीला ठरविले डायन
- पारसी नावाची ही महिला चार महिन्यांपासून वडिलांच्या घरी राहात आहे.
- तीन वर्षांपूर्वी पारसीचे लग्न रायपूरमधील तिलेश्वर गावातील मुकेशसोबत झाले होते. मुकेशची बहिण इंद्राला हे लग्न मान्य नव्हते. विशेष म्हणजे इंद्रा ही तलाठी आहे.
- दरम्यान, मुकेशच्या घरातील दोन बकऱ्या मेल्या. इंद्राने आरोप केला की पारसीनेच या बकऱ्यांचा बळी घेतला आणि तिला डायन ठरविले. त्यानंतर संपूर्ण कुटुंबच पारसीवर तुटून पडले.
- पारसीला सर्वांनी बेदम मारहाण करुन रात्रीच्यावेळी घऱातून बाहेर काढले. यानंतर पारसीच्या माहेरच्या लोकांनी अनेकदा जातपंचायत केली मात्र प्रभावशाली सासरची मंडळी तिला घरात घेण्यास तयार नाही.
- पारसीच्या नातेवाईकांनी पोलिसांकडेही मदत मागितली मात्र त्यांना तिथेही न्याय मिळाला नाही. सासू-सासऱ्यांना एक-दोन दिवस तुरुंगात ठेवून सोडून देण्यात आले. पारसी मात्र बेघर झाली.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, नग्न करुन तीन गावातून काढली धिंड...

सर्व फोटो महेंद्र शर्मा
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...