आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुरखा-हिजाब परिधान करुन काश्मीरी मुली खेळल्या क्रिकेट, चॅम्पियनशिप जिंकली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ही बुरख्यातील तरुणी ऑलराऊंडर आहे. - Divya Marathi
ही बुरख्यातील तरुणी ऑलराऊंडर आहे.
बारामुला - तुम्ही जर जॉली एलएलबी-2 चित्रपट पाहिला असेल तर त्यामध्ये बुरखा इलेव्हन आणि घुंगट इलेव्हन यांच्यात झालेला क्रिकेट सामना तुम्हाला आठवत असेल. मात्र काश्मीरी तरुणींचे हे वास्तव आहे. चित्रपटात बुरखा आणि घुंगटमध्ये क्रिकेट खेळणाऱ्या महिला दाखवण्यामागे विनोदाचा भाग असला तरी काश्मीरमध्ये या तरुणींसाठी हे सक्तीचे आहे. काश्मीरच्या मुलींनी बुरखा आणि हिजाब परिधान करुन खेळावे लागले. यातीलच एक आहे इंशा. इंशा बारामुला गव्हर्नमेंट वुमन्स कॉलेजची कॅप्टन आहे. ती हिजाब परिधान करुन क्रिकेट खेळते. रोज बॅट घेऊन कॉलेजच्या क्रिकेट ग्राऊंडवर प्रॅक्टिससाठी हजर असते. तिच्याशिवाय दुसऱ्या मुलीही आहेत ज्या बुरखा आणि हिजाबमध्ये क्रिकेट खेळतात. यांना फक्त क्रिकेटच्या मैदानावर लढावे लागते असे नाही तर त्यांना सामाजिक आणि धार्मिक रुढींशीही रोज सामना करावा लागतो. मात्र या सर्वांना टक्कर देऊन त्या खेळत आहेत, नुसत्या खेळत नाही तर त्यांनी गेल्या आठवड्यात युनिव्हर्सिटी क्रिकेट चॅम्पियनशिप जिंकली आहे. 
 
बुरखा घालणारी ऑल राऊंडर 
- इंशा द्वितीय वर्षाला आहे. ती आमिर खानची टीव्ही सीरियल सत्यमेव जयतेचे 'बेखौफ आझाद रहना है मुझे' गाणे गुणगुणत मैदानावर येते. दुसऱ्या मुलीही हेच गाणे म्हणत असतात. यांना क्रिकेट खेळायचे आहे. मग भलेही ते बुरखा घालून खेळावे लागले तरी त्यांची तयारी आहे. या सर्वांना एकाचवेळी दोन मैदानांवर लढा द्यायचा आहे. एक प्रत्यक्षात मैदानावर आणि दुसरा समाजाच्या परंपराशी. 
- राब्या प्रथम वर्षाची विद्यार्थीनी आहे. ती टीममध्ये ऑलराऊंडर आहे. ती बुरखा घालून बॅटिंग, बॉलिंग  आणि फिल्डिंग करते. बारामुलामध्ये राहात असताना तिला बुरखा घालावा लागत होता, श्रीनगरमध्ये आल्यानंतर त्यात थोडी सवलत मिळाली आणि आता ती हिजाबसह खेळते. 
- राब्या म्हणाली, 'मी दारासगाह (इस्लामिक शिक्षण देणारी संस्था) मध्ये शिक्षण घेते आणि मी माझ्या शिक्षकांच्या शिकवणीविरोधात जाऊ शकत नाही.'
 
पहिल्यापासून अनेक संकटाचा सामना केला 
- क्रिकेट टीमची कॅप्टन इंशा जम्मू-काश्मीर वुमन्स क्रिकेट टीममध्ये खेळली आहे. याशिवाय व्हॉलिबॉलच्या नॅशनल टीममध्येही तिची निवड झाली होती. तिची खेळण्याची सुरुवात बुरख्यातूनच झाली. समाजाने सुरुवातीला तिच्या खेळण्याला विरोध केला, तिच्यावर टीका-टीप्पणीही केली. 
- इंशा सांगते, 'हा प्रवास सोपा नव्हता. मी जेव्हा ट्रॅक्स आणि क्रिकेट बॅट घेऊन निघायचे तेव्हा लोक माझ्या वडिलांकडे तक्रार करायचे, मात्र माझ्या कुटुंबाने मला पूर्ण पाठिंबा दिला.'
 
चॅम्पियनशिपमध्ये खेळण्यासाठी कॉलेजमध्ये ग्राऊंड तयार केले 
- कॉलेजचे उर्दूचे प्राध्यापक रहमत उल्लाह मीर यांनी इंशामधील खेळाडूला ओळखले होते. त्यांनी तिला प्रोत्साहन दिले. ते म्हणाले, 'तिचा खेळ पाहून मी आश्चर्यचकित झालो होतो. मी तिला सांगितले क्रिकेट खेळत जा. यात काही तरी कर. कॉलेजमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्पोर्ट्स पॉलिसी नसल्यामुळे काही अडचणी आल्या. त्यासाठी आम्ही सोशल मीडियावर मदतीचे आवाहन केले. तिथे सहाकार्य आणि मदत करण्याऐवजी लोकांनी आमचे मनौधैर्य खच्चीकरण करणाऱ्या कॉमेंट्स केल्या.'
- 'आम्ही कॉलेजच्या प्राचार्यांच्या मदतीने टीम तयार करण्याचा निर्णय केला आणि ही टीम विद्यापीठाच्या स्पर्धेत सहभागी झाली. जेवढ्या सहजतेने मी सांगत आहे तेवढे हे सोपे नव्हते. फिजिकल ट्रेनर गुरदीपसिंग आणि शौकत अहमद यांनी मुलींना ट्रेनिंग देण्यास सुरुवात केली. इंशा राष्ट्रीय हॉलिबॉल टीममध्ये खेळली असल्यामुळे त्याचा तिला फायदा झाला.'
 
कुटुंबाची परवानगी मात्र बुरखा घालून 
- इंशा म्हणाली, 'आम्हाला स्पोर्ट्समध्ये काही करुन दाखवायचे आहे. आम्ही सरकार दरबारीही अनेकवेळा ट्रेनिंग सेंटर सुरु करण्याची मागणी केली होती, मात्र कोणीही आमचे ऐकलेले नाही. कुटुंबातूनही सर्वांनीच सपोर्ट केला असेही नाही. आमच्याकडे अनेक चांगले खेळाडू आहेत. जशी राब्या. मात्र तिच्या कुटुंबांने एका अटीवर क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली. खेळायचे तर बुरखा घालून ही त्यांची अट होती. दुसऱ्या मुलींनाही हिजाब घालून खेळण्याची परवानगी त्यांच्या कुटुंबाने दिली.'
बातम्या आणखी आहेत...