आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनासाठी संघर्ष करणा-या पतीसाठी पत्नी रस्त्यावर फिरून मागतेय न्याय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो : न्यायासाठी फिरणा-या परमजीत कौर)

अमृतसर - 'बादल साहिब मेरे घरवाले (पती) को मार-मार कर अधमरा कर दिया, वह पिछले 5 दिनों से अस्पताल में जिंदगी और मौत से लड रहा है, यदि मुझे इंसाफ न मिला तो मैं अपनी जान दे दूंगी..' हे शब्द आहेत न्यू शहीद उधम सिंग नगरच्या सुखा ताबाल परिसरातील महिला परमजीत कौर हिचे. ती गुरुवाली येथे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या संगत दर्शन उपक्रमात न्याय मागण्यासाठी पोहोचली होती. बादल यांनी लगेचच पोलिस अधिका-यांना त्या महिलेची समस्या जाणून घेऊन ती सोडवण्याचे आदेश दिले.

परमजीतने सांगितले की, तिचा पती हरिंदरसिंह याचे वल्ला येथील श्री गुरू रामदास इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस समोर औषधाचे दुकान आहे. त्याट ठिकाणच्या गोल्डी मेडिकल स्टोअरच्या मालकाने रुग्णालयातील औषधींच्या दुकानाचे कंत्राट घेतलेले आहे. तो औषधे महागात विकतो तर तिचा पती स्वस्तात औषधांची विक्री करतो. याच कारणावरून गोल्डी आणि त्याचे भाऊ हरिंदर याला त्रास देत आहेत. 6 डिसेंबरला गोल्डीचा भाऊ गुरमेजसिंग आणि सुखप्रीतसिंगने हरिंदरवर प्राणघातक हल्ला केला. आता त्याला आणि त्याच्या दोन्ही मुलांना मारण्याची धमकी दिली जात आहे. पोलिसही काही कारवाई करण्यास तयार नाहीत. हरिंदरसिंगची आई बलविंदर कौरनेही बादल यांच्याकडे आरोपींकडून कुटुंबाला सुरक्षा देण्याची विनंती केली.
बादल यांनी पोलिस अधिका-यांना महिलेचे सर्व म्हणणे ऐकूण तपास करून कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिस राजकीय दबावामुळे कारवाई करत नसल्याचे ही महिला वारंवार ओ़रडून सांगत होती. तसेच न्याय मिळाला नाही तर प्राण देण्याचा इशाराही या महिलेने दिला आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, न्याय मागण्यासाठी फिरणा-या परमजीत यांचे फोटो...