मुजफ्फरनगर - उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यातील शहापूर परिसरात एका तरुणीवर आठ जणांनी बलात्कार करून अत्याचाराचा व्हिडीओ फेसबूकवर अपलोड केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून यात मुलीच्या मित्राचाही समावेश आहे. दुसरीकडे, राजस्थानमध्ये एका पित्याने मुलीवर बलात्कार करून तिला गळा दाबून ठार केल्याचे समोर आले आहे.
गँगरेपचा व्हिडीओ तयार केला
पीडितेने मंगळवारी या प्रकरणी तक्रार दाखल केली. हा प्रकार गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातील असल्याचे या तरुणीने सांगितले. ही तरुणी आपल्या एका मित्राबरोबर बाहेर जेवायला गेली होती. त्यावेळी बासधादा गांवाच्या जवळ चार तरुणांनी त्यांना अडवले. ते तरुणीला एका सामसुम जागी घेऊन गेले. त्याठिकाणी तिघेजण आधीच उपस्थित होते. त्यानंतर त्या पाच जणआंनी तरुणीवर गँगरेप केला. तर त्याठिकाणी असलेल्या तिघांनी हा संपूर्ण घटनाक्रम रेकॉर्ड केला. याबाबत तरुणीने कोणाला काही, सांगू नये म्हणून तिला धमकावण्यातही आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीने तिचा व्हिडीओ इंटरनेटवर अपलोड केल्या जाण्याच्या भीतीने कोणालाही काहीही सांगितले नाही. मात्र, नंतर जेव्हा या तरुणीला व्हिडीओ फेसबूकवर अपलोड झाल्याचे समजले, त्यावेळी या मुलीने पोलिसांत दाव घेतली. एसएसपी एच.एन.सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी आठ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या आरोपींची नावे राशीद, वासीक, अब्दुल रहमान, शौकन, मोनू, राहुल आणि सलाऊ अशी आहेत. यात शौकन, वासीक, राशीद आणि अब्दुल रहमान यांना अटक करण्यात आली आहे.
फाईल फोटो - बदायूं येथील बलात्कारानंतर केरळ येथील महिलांनी केलेल्या निदर्शनांचा फोटो