आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Have Disrobed For Seats Says Cherian Philip

माजी काँग्रेस नेत्याचा आरोप, तिकीटासाठी महिलांना करावी लागते 'तडजोड'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिरुअनंतपूरम (केरळ) - माजी काँग्रेस नेते चेरियन फिलिप यांनी पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप केले आहे. राजकाराणात महिलांना अनेक 'तडजोडी' कराव्या लागत असल्याचे ते म्हणाले. रविवारी फेसबुक पोस्टवरद्वारे त्यांनी आरोप केला, 'निवडणुकीचे तिकीट हवे असेल तर महिलांना वरिष्ठ नेत्यांसोबत शरीर संबंध ठेवावे लागतात.' फिलिप कधीकाळी पक्षाचे ज्येष्ठ नेते ए.के. अँटनी आणि मुख्यमंत्री सी.एम. ओमान चांडी यांचे निकटवर्तीय होते.
काय म्हणाले फिलिप
काही दिवसांपूर्वी स्थानिक निवडणुकीत युवक काँग्रेसच्या कार्यकत्यांना तिकीट मिळाले नव्हते. त्याचा निषेध व्यक्त करत कार्यकर्त्यांनी विना शर्ट आंदोलन केले होते. त्याचा हवाला देत फिलिप यांनी लिहिले, 'युवक काँग्रेसने शर्ट उतरवून जे आंदोलन केले ते मॉडेल आंदोलन होते, याआधी ज्या महिलांनी गुपचूप असे आंदोलन केले त्यांना काँग्रेसचे तिकीट मिळाले आहे.' फिलिप यांच्या या वक्तव्याने गदारोळ माजल्यानंतर काँग्रेसच्या प्रदेश कमिटीने त्यांना हे वक्तव्य परत घेण्याची मागणी केली आहे.