आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आँखोदेखी : लोक फोटो काढत हाेतेे, मदत केली असती तर प्राण वाचले असते..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियाना - येथील शेरपूमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. बलजिंदर कुमार आपल्या सहकाऱ्यासोबत सायकलवरून जात होता. रस्त्याने त्यांना टाटा ४०७ कँटरने उडवले. लोकांनी कँटर चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. बघ्यापैकी काही जणांनी जखमी बलजिंदरला ओळखले आणि रुग्णालयात नेले. मात्र, दुसरा अनोळखी व्यक्ती तसाच पडून राहिला. त्याची मदत करण्याऐवजी लोकांनी त्याचे चित्रीकरण करण्यात धन्यता मानली.
यादरम्यान तरुणी सुनीता शर्मा आणि तिचा भाऊ रोहित तिथे पोहोचले. संवेदनहीन लोकांकडे पाहून भाऊ-बहीण जखमीच्या मदतीसाठी पुढे सरसावले. सुरुवातीस पोलिस आणि रुग्णवाहिकेस फोन केला. मात्र, त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर सुनीताने एक ऑटो केला आणि भावाच्या मदतीने जखमीला बसवले. त्याचा जीव वाचावा यासाठी जवळच्याच कॅन्सर हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, तिथेही रुग्णालयाकडून प्रतिसाद मिळाला नाही. जखमीला दाखल करून घेतले नाही. दोघे जखमीला १५ मिनिटांपर्यंत रुग्णालयाबाहेर घेऊन बसले. यादरम्यान सुनीताने मोबाइलवरून पोलिसांना १०० क्रमांकावर १२ वेळेस फोन केला. अनेकदा उचलला व कट करण्यात आला. सुनीताने कॅन्सर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना विनवणी केल्यावर रुग्णालय व्यवस्थापनाने एक रुग्णवाहिका बोलावली.

लोकांनी मदत केली असती तर वाचले असते प्राण
मी बाइकवरून भावासोबत जात होते. काही जण कोणाला तरी मारत असल्याचे पाहिले, काही चित्रीकरण करत होते. थांबून पाहिले तर एक व्यक्ती रस्त्यावर तडफडत होता. लोकांकडे मदत मागितली, मात्र सगळ्यांनी पाठ फिरवली. अनेकदा विनवणी केल्यानंतरही रुग्णालयाकडून उपचार झाले नाहीत. पोलिस आणि रुग्णवाहिकेसाठी फोन केला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. पोलिस आणि रुग्णवाहिका सेवेकडून प्रतिसाद मिळाला असता आणि रुग्णाला वेळेत उपचार मिळाले असते तर त्याचा जीव वाचला असता. मरणारा काेण होता हे मला माहीत नव्हते. मात्र, जखमीचा जीव वाचू शकला नाही याची मात्र सल राहील. -
(सुनीता शर्मा, पीयूमध्ये कार्यरत आहे.)

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...