आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींच्या रॅलीदरम्यान वृद्ध महिलेने केला नोटबंदीचा विरोध, पोलिसांनी तोंड दाबून मारले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदी भाषणादरम्या नोटबंदीवर बोलत होते, तेव्हा वृद्ध महिलेने त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. - Divya Marathi
मोदी भाषणादरम्या नोटबंदीवर बोलत होते, तेव्हा वृद्ध महिलेने त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला.
भटिंडा (पंजाब) - भटिंडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान एका वृद्ध महिलेने नोटबंदीच्या विरोधात घोषणाबाजी केली. महिला अधिक काही बोलण्याआधीच पोलिस तिच्यावर तुटून पडले. तिचा विरोध तिथल्यातिथे दाबण्यात आला. महिलेचे तोंड दाबून तिच्या डोक्यावर लाठ्यांचे प्रहार केले गेले. वृद्ध महिलेच्या डोक्यातून रक्त वाहात असताना पोलिसांनी तिला ओढत बाहेर नेले.
कोण होती वृद्ध महिला..
- एम्सच्या भूमिपूजनानंतर जाहीर मेळाव्यात मोदी नोटबंदीवर बोलत असताना महिला त्यांच्या या निर्णयाचा विरोध करण्यासाठी उठली.
- यावेळी शिरोमणी अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी तिच्यापुढे पंजाब सरकार जिंदाबादचे बॅनर धरले आणि त्यामागे पोलिसांनी महिलेचा आवाज दाबला.
- या महिलेचे नाव बलविंदर कौर असल्याचे समजते. तिने पर्ल ग्रुपमध्ये गुंतवणूक केली होती. या ग्रुपने 6 कोटी लोकांचे 49 हजार कोटी रुपये हडपल्याचा आरोप आहे.
- पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांचा ड्रीम प्रोजेक्ट कबड्डी वर्ल्ड कपला गेल्या पाच वर्षांपासून पर्ल ग्रुप फंडिंग करत आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, महिलेचे दाबले तोंड..
बातम्या आणखी आहेत...