आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Soldiers And Foreign Women Celebrate Karvachauth In Udaipur

एका हातात बंदूक तर दुसर्‍या हातात चाळणी, महिला जवानांनी साजरी केली करवा चौथ!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगंगानगर- करवा चौथच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (11 ऑक्टोबर) कर्तव्य आणि भारतीय संस्कृतीचे अनोखा संगम पाहायला मिळाला. बीएसएफच्या 52 बटालियनमध्ये तैनात महिला जवानांनी आपले कर्तव्य बजावताना करवा चौथ हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.

शनिवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास चंद्र दिसताच दौसा येथील महिला जवानांनी चाळणीतून चंद निहाळला आणि आपापल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी मनोकामना केली. सीमेवर कर्तव्य बजावताही सर्व महिला जवानांनी पूर्ण दिवस न‍िर्जल व्रत केले.

करवा चौथ हा सण संपूर्ण देशात हर्षोल्हासात साजरा केला जातो. 'डिस्को आणि पब' संस्कृतीत जीवन जगणार्‍या परदेशी महिलांनी उदयपूरमध्ये करवा चौथ साजरी केली. सगळ्या महिला भारतीय पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. भारतीय महिलाप्रमाणे परदेशी महिलांनीही निर्जल व्रत केले. रात्री आकाशात चंद्र दिसताच आपापल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी परमेश्वराला साकडे घातले.

पुढील स्लाइड्स पाहा, करवा चौथ साजरी करताना महिला...