आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women SP Sangita Kaliya And Minister Aroused Controversy

महिला एसपी व मंत्र्यातील वाद भडकला, टीकेचे धनी बनले आरोग्यमंत्री अनिल वीज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - हरियाणातील फतेहाबादच्या महिला पोलिस अधीक्षक संगीता कालिया यांची बदली होऊनही वाद शांत झालेले नाही. याप्रकरणी चहूबाजूंनी टीकेचे धनी बनलेले हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी रविवारी याप्रकरणी ट्विटरवरून स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले.
"एसपी संगीता कालिया यांनी भर बैठकीतच अवैध मद्यविक्री विरोधात तक्रार घेऊन आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांना धमकी द्यायला सुरुवात केली होती. या कृत्यातून त्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मादक द्रव्य आणि मद्यमाफियांना मदत करत होत्या.' दरम्यान, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी कालिया यांची बदली योग्य असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात आयएएस अशोक खेमका यांनीही उडी घेतली.