आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिला कर्मचा-यांनी नाहक फिरू नये; कर्नाटकात फर्मान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - ड्यूटीच्या वेळात विनाकारण इकडे-तिकडे फिरू नका, असे फर्मान महिला कर्मचा-यांना देणारे एक परिपत्रक कर्नाटक विधानसभा सचिवालयाने काढले आहे. मोबाइल मोठ्याने न बोलण्याचे आदेशही कर्मचा-यांना त्यात देण्यात आले आहेत. अधिकारी, कर्मचा-यांनी शिस्तीचे पालन करण्यासाेबतच विधानसभेतील कामाच्या वेळेत गटागटाने उभे राहून गप्पा करू नयेत. मोबाइलवर मोठ्याने बोलणे व विनाकारण इकडेतिकडे फिरण्यावरून कारवाई करण्याचा इशाराही परित्रकात देण्यात आला आहे. काही महिला कर्मचा-यांनी या परिपत्रकाचा निषेध केला आहे. कार्यालयीन कामासाठीच आम्हाला फिरावे लागते, असे त्यांचे म्हणणे आहे. सचिवालयातील कर्मचारी महिलांकडून शिस्त पाळली जात नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे हे फर्मान निघाले आहे.