आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन मुलींनी 51 सेकंदात चोरला दुकानातून मोबाइल, Whats App मुळे 36 तासात जेरबंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा (बिहार) - सोशल नेटवर्किंगचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. मात्र, सोशल नेटवर्किंगमुळे चोरही पकडले जाऊ शकतात याचा प्रत्यय पाटण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी एका दुकानातून मोबाईल चोरी केलेल्या मुली दुसर्‍या दुकानात हात साफ करण्यासाठी गेल्या असताना, व्हॉट्स अॅपवर त्यांच्या कारनाम्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने चतुर्भूज झाल्या.
काय आहे प्रकरण
दोन दिवसांपूर्वी येथील गांधी मैदानातील टाटा झोन दुकानातून काही मुलींनी मोबाईल चोरी केले होते. त्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाले होते. याच मुलींनी मंगळवारी मौर्यलोक येथील राज टेलिकॉममध्ये प्रवेश केला आणि मोबाईल दाखवण्याची मागणी केली. व्हॉट्स अॅपवर त्यांचा व्हिडिओ पाहिलेल्या राज टेलीकॉमच्या स्टाफमधील एका मुलाने त्यांना ओळखले आणि आपल्या मालकाला त्याची माहिती दिली. त्यांनी तत्काळ टाटा झोनचे मालक रोशन यांना याची माहिती दिली. ते पोलिसांसह राज टेलिकॉममध्ये दाखल झाले. टाटा झोनचे मालक रोशन यांनी त्यांच्या दुकानात चोरी करणार्‍या मुली याच असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या दोघींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मोबाइल चोर मुलींसोबत आणखी एक अल्पवयीन मुलगी देखील आहे.
पोलिसांनी त्या दोघींचे नाव अराधना आणि पूनम असल्याचे सांगितले आहे. तिसरी मुलगी अल्पवयीन असल्याने तिची ओळख उघड करण्यात आलेली नाही.
व्हॉट्स अॅपवर व्हायर झालेला व्हिडिओ पाहिले 1100 लोकांनी
रविवारी सायंकाळी टाटा झोनमध्ये दोन मुली मोबाइल खरेदीसाठी आल्या. दुकानातील कर्मचार्‍यांचे दुर्लक्ष होताच या दोघींनी महागड्या मोबाइलवर हात साफ केला. अवघ्या 51 सेकंदात त्यांनी 12,500 रुपयांचा मोबाइल चोरुन पोबारा केला. दुकानात चोरी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मालक रोशन यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात दोन मुलींनी चोरी केल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी 51 सेकंदाचे फुटेज व्हॉट्स अॅपवर अपलोड केले आणि ते व्हायरल झाले. व्हॉट्स अॅपच्या विविध ग्रुपने तो व्हिडिओ शेअर केला आणि जवळपास 1100 लोकांनी तो पाहिला. या व्हिडिओचा परिणाम 36 तासातच पाहायला मिळाला आणि टाटा झोनमध्ये चोरी करणार्‍या मुलींना रंगेहात पकडण्यात आले.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, कशी केली 51 सेकंदात चोरी