आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिवासी महिलांद्वारे हवामान केंद्रांचे संचालन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्ली हिल्स (तामिळनाडू) - तामिळनाडूच्या डोंगराळ भागात आदिवासी महिला शेतकरी या अनेक सामुदायिक स्वयंचलित हवामान केंद्रांचे व्यवस्थापन करत आहेत. त्या हवामानाचे अचूक भाकीत वर्तवण्यासोबतच अन्नधान्य तसेच पोषण सुरक्षा सुनिश्चित करण्यात मोठा बदल घडवून आणत आहेत. एकाअर्थी आदिवासींच्या निसर्गविषयक उपजत ज्ञानाला आता तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे.

राज्याच्या कृषी-पर्यावरणीय क्षेत्रात एकूण सात स्वयंचलित हवामान केंद्रे आहेत. त्यापैकी चार केंद्रांचे महिलांकडून तर तीनचे पुरुषांकडून संचालन केले जात आहे. ते सर्व आदिवासी शेतकरी आहेत. ही केंद्रे शेतीसाठी फायदेशीर ठरणार्‍या हवामानाची माहिती देतात. कीरैकादू हवामान केंद्र चालवणार्‍या २४ वर्षांच्या परमेश्वरी म्हणाल्या, हे काम तरुण आदिवासी महिला आणि पुरुष स्वच्छेने करतात. त्यांना एमएसएसआरएफच्या वतीने दरमहा १५०० रुपयांचा प्रोत्साहन भत्ता दिला जातो.

विजयालक्ष्मींचा अनुभव : थुवरापल्लममध्ये एका केंद्राचे व्यवस्थापन करणार्‍या २३ वर्षीय विजयालक्ष्मी प्रदीप या म्हणाल्या, आम्ही स्वयंचलित हवामान केंद्रात तापमान, पाऊस, आर्द्रता, वार्‍याचा वेग, दिशा आणि किरणोत्सर्ग आदींचा डाटा गोळा करत आहेत. आपल्याला हवामानाशी संबंधित आधारभूत बाबींची नोंद घेणे, कॉम्प्युटर चालवणे आणि माहिती प्रणालीचे व्यवस्थापन करण्याचे प्रशिक्षण मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

सहा केंद्रे : गेल्यावर्षी कोल्ली पर्वतीय क्षेत्रातील मुलाकदाईमध्ये पहिल्या हवामान केंद्राची स्थापना करण्यात आली. यंदा नावाकादू, थुवरापल्लम, अरिपालापट्टी, किरैकादू, वेंदलप्पाडी आणि पुलिमापट्टीत आणखी सहा हवामान केंद्रांची स्थापना करण्यात आली. हे सर्व भाग विविध कृषी-पर्यावरणीय क्षेत्रांत येतात. येथे आदिवासी समुदाय मोठ्या प्रमाणात आहे.

जीपीआरएस क्लाऊड सर्व्हर तंत्रज्ञान
एमएसएसआरएफचे मुख्य शास्त्रज्ञ ऑलिव्हर किंग म्हणाले, ही केंद्रे जीपीआरएस क्लाऊड सर्व्हर तंत्रज्ञानावर आधारित आहेत. सेन्सर्सद्वारे डाटा गोळा केला जातो. दर दहा मिनिटांनी केंद्र हवामानाची माहिती देते. हा डाटा माहितीच्या स्वरूपात गावागावांत लाऊडस्पीकर, एसएमएस, ग्राम माहिती केंद्रांमार्फत सर्वत्र प्रसारित केला जातो. एका केंद्र उभारणीस १.७५ लाखांचा खर्च येतो.

उद्देेश : या हवामान केंद्रांचा प्रमुख उद्देश हा शेती आणि कृषीसंबंधित उपक्रमांत मदत करणे हा आहे. या क्षेत्रात राहणार्‍या बहुतांश “मलयाली’ आदिवासी समुदायासाठी शेतीच हा प्रमुख उपजीविकेचा स्राेत आहे.
स्थापना
केंद्रांची स्थापना एम. एस. स्वामिनाथन संशोधन संस्थेने बायोडायव्हर्सिटी इंटरनॅशनल आणि इंटरनॅशनल फंड फॉर अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंटच्या मदतीने केली होती.
बातम्या आणखी आहेत...