आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिलांसाठी स्वयंपाकघरातून काम करणारे तंत्रज्ञान हवे! इव्हांका ट्रम्प यांचे मत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद- नोकरी किंवा कामाच्या ठिकाणी महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी धोरणात बदल करणे गरजेचे आहे. धोरणाद्वारे पाठिंबा मिळाल्यास महिलांचा सहभाग वाढवता येऊ शकतो. मात्र त्यासाठी महिला स्वयंपाकघरातून देखील काम करू शकतील, असे तंत्रज्ञान विकसित करायला हवे असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्या तथा सल्लागार इव्हांका ट्रम्प यांनी म्हटले आहे. 


   महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाची देखील मदत घेतली जाऊ शकते. महिला स्वयंपाक घरातून आपले काम निर्विघ्नपणे पूर्ण करू शकतात. त्या माध्यमातून लिंगभेदभाव दूर करणे शक्य आहे. त्यासाठी मात्र सरकारची तशा प्रकारची धोरणे हवीत. धोरणाचा पाठींबा मिळाल्यास आधुनिक काळात बदल पाहायला मिळू शकतात. परंतु त्यासाठी आवश्यक मार्ग कशा प्रकारे असू शकतात, त्यावर आपण सर्वांनी िमळून विचार केला पाहिजे, असे इव्हांका म्हणाल्या.जागतिक उद्योजकता संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी इव्हांका यांनी आपले विचार मांडले. आधुनिक काळातील नव्या प्रकारच्या कामगारांचा विचार आता करण्याची वेळ आली आहे. तंत्रज्ञानाने अनेक प्रकारचे अडथळे दूर केले आहेत. त्यातून कामाच्या स्वरूपात एक प्रकारची लवचिकता आली आहे. तंत्रज्ञानाने महिलांसाठी असंख्य प्रकारच्या संधी निर्माण केल्या आहेत. महिलांना उद्योजक होण्याची संधीही आहे. त्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण द्यावे लागेल. त्यामुळे चांगले परिणाम पाहायला मिळू शकतात.

 

महिलांना योग्य संधी द्या
पुरुषांचे साम्राज्य असलेल्या क्षेत्रात महिलांना अग्रक्रमाने संधी दिली जावी. अशा प्रकारच्या धोरणाचा अवलंब झाल्यास स्त्री-पुरुष समानता प्रत्यक्षात येण्यास मदत होईल. अमेरिकेत अभियांत्रिकी क्षेत्रात केवळ १३ टक्के महिला प्रतिनिधित्व करतात. संगणकीय शास्त्रात २४ टक्के महिला व्यावसायिक आहेत. या भेदभावामुळे स्त्री-पुरूषांतील वेतनातही तफावतही वाढत जाईल, अशी भीती इव्हांका यांनी व्यक्त केली. 

बातम्या आणखी आहेत...