आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Whole Life Go For Searching Gold In Rivers

नदीतून सोन्याचे कण शोधण्यात सरले महिलांचे अवघे आयुष्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तमाड/ रांची - सोन्याचे आकर्षण सर्वांनाच असते. खास करून महिलांना यात विशेष रस असतो. मात्र, रांचीपासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर वाहणा-या करकरी नदीतून गेल्या अनेक वर्षापासून सोने वेचण्याचे काम करणा-या महिलांची पिढ्या न पिढ्या उपेक्षाच होत आहे. या महिला वाळूतून सोने शोधण्याचे काम करतात. मात्र, यातून त्यांना दोन वेळेचे जेवण मिळेल एवढीच रोजंदारी मिळते.


पात्रातून काढतात असे सोने
सकाळी घरचे काम आटोपल्यानंतर महिला 10 च्या सुमारास नदीतील पात्रात उतरतात. एका टोपल्यात वाळू घेऊन पाण्याच्या प्रवाहात धरतात. त्यानंतर टोपल्यातील वाळूत चकाकणारे कण अडकून बसतात. सर्व सोनेरी कण एकत्र करुन ते बाजारात विकतात. सूर्यास्तापर्यंत या महिला सतत काम असतात.