आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Womens Are Getting Firing Training After Peshawar Attack

PHOTOS : पाकिस्तानी टिचर्स घेताहेत शस्त्रास्रांचे प्रशिक्षण, शाळेत नेता येणार GUN

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - गन चालवण्याचे प्रशिक्षण घेणारी महिला
इस्लामाबाद - पाकिस्तानच्या पेशावर येथील आर्मी स्कूलवर झालेल्या दहशतवादगी हलल्यात सुमारे दीडशे निरागस बालकांचा बळी गेला होता. त्यानंतर पाकिस्ताने दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी पावले उचलण्याचा निर्णय घेतले. त्याअंतर्गत पाकिस्तानच्या पेशावर येथील शालेय शिक्षक शिक्षिकांनाही शस्त्रास्रांचे प्रशिक्षण दिले जात आहेत.

शिक्षकांना दहशतवाद्यांबरोबर लढा देण्याचे आणि त्यांच्यापासून संरक्षण करण्याचे प्रशिक्षणही दिले जात आहे. पहिल्या बॅचमध्ये फ्रंटियर कॉलेजच्या महिला शिक्षिकांना हे प्रशिक्षण देण्यात आले. गेल्यावर्षी 16 डिसेंबरला झालेल्या या हल्ल्यानंतर अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज व्यक्त करण्यात आली होती.
पाकिस्तानचे शिक्षणमंत्री आतिफ खान यांनी सांगितले की, खैबर पख्तूनख्वामध्ये 35 हजार शाळा आहेत. या सर्वांना सुरक्षा पुरवणे शक्य नाही. त्यामुळे शिक्षकांना अशा प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे. एखाद्या शिक्षकाला शाळेत बंदूक न्यायची असेल तर आम्ही त्यांना परमिट देणार आहोत. मात्र, खासगी शाळांच्या शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मलिक खालीद खान यांनी या निर्णयाचा विरोध केला आहे. शिक्षकाच्या एका हातात बंदूक आणि दुसर्या हातात पुस्तक असेल तर तो शिकवणार कसा असा सवाल त्याने उपस्थित केला आहे. बंदुकधारी शिक्षकांचा विद्यार्थ्यांवर विपरित परिणाम होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

खैबर पख्तूनचे माहिती मंत्री मुश्ताक अहमद गनी म्हणाले की, प्रशिक्षण देण्यात येणार्‍या शिक्षकांना केवळ दहा मिनिटे दहशतवाद्यांशी लढावे लागेल. त्यानंतर संरक्षक दल त्याठिकाणी पोहोचेल. गनी यांनी सर्व सरकारी शाळांमध्ये 8 फूट उंचीची संरक्षक भींत तयार केली जाणार असल्याचेही स्पष्ट केले. खासगी शाळांनाही कडक दिशानिर्देश देण्यात आले आहेत. सर्व नियमांचे पालन केले नाही तर, त्यांचा परवाना रद्द करण्यात येणार असल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
पुढील स्लाइड्वर पाहा, प्रशिक्षण घेणार्‍या टिचर्सचे PHOTO