आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे रात्रभर डान्स करत असतात महिला, वर्षातून एकदा दिसतो हा नजारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - इंदूरचा हरतालिका महोत्सव संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. हरतालिकेच्या रात्री याठिकाणी हजारोंच्या संख्येत महिला आणि तरुणी राजवाडा येथे एकत्र येतात. त्यानंतर शंकराच्या भक्तीत लीन होऊन रात्रभर त्या नृत्य करतात. पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यासाठी रविवारी महिलांनी उपवास केले. तर अविवाहित तरुणीनी चांगला वर मिळावा यासाठी शंकराची उपासना केली.

होळकर राजघराण्याने सुरू केली होती परंपरा
- शहरातील हजारो महिला सोळा शृंगार करून पुजा केल्यानंतर रात्री 8 च्या सुमारास राजवाडा येथे पोहोचू लागतात.
- याठिकाणी महिला आणि तरुणी रात्रभर शंकराच्या भक्तीत लीन होत बेफाम नृत्य करतात.
- पहाटेपर्यंत हे नृत्य चालते. त्यानंतर सगळे पुजा करून आपआपल्या घरी परततात.
- या महोत्सवाची सुरुवात इंदूरच्या होळकर राजघराण्याने सुरू केली होती.
- त्यावेळी शाही कुटुंबातील महिलांबरोबर हा उत्सव साजरा करण्यासाठी इंदूर बरोबरच आजुबाजुच्या परिसरातील महिलाही यायच्या.
- लांब अंतरावरून येणाऱ्या महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी सर्व प्रकारची व्यवस्था केली जायची.
- होळकरांचे राज्य गेले तरीही ही परंपरा तेव्हापासून सुरुच आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या महोत्सवातील काही PHOTOS..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...