आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women's In Punjab Started Organic Farming To Fight With Cancer

कॅन्सरवर मात करण्यासाठी किचन गार्डन शेती, पंजाबच्या महिलांनी सुरू केली सेंद्रिय शेती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगरूरपासून १४-१५ किमी अंतरावर बर्नालाचे एक छोटेसे गाव मल्लिया आहे. इथे कॅन्सरमुळे तीन महिलांचा मृत्यू झाला. दोन कॅन्सरग्रस्त आहेत. कीटकनाशकांच्या वापरातून पिकवलेल्या भाज्यांमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, १७० उंब-यांच्या या गावात आता गेल्या चार वर्षांत मात्र कॅन्सरचा एकही रुग्ण आढळला नाही. येथील महिलांमुळे ते शक्य होऊ शकले. कॅन्सरच्या जीवघेण्या आजारापासून बचाव करण्यासाठी चार वर्षांत त्यांनी बटाटे, कांदा,
कोथिंबीर, मुळा आदी भाज्या आपल्या किचन गार्डनमध्येच लावल्या. विशेष म्हणजे या महिलांनी शेजारील गावच्या महिलांनाही या अभियानाशी जोडले.
भोतणा गावात परमिंदर कौर आणि परमजित यांचा स्तनाच्या कर्करोगामुळे मृत्यू झाल्यानंतर कमलजित कौर यांनी २०१० मध्ये या अभियानाची सुरुवात केली. काही दिवसांनंतर स्नेही सुरिंदर कौर यांच्यासारखी तिची स्थिती झाली. या मृत्यूचा त्यांना धक्काच बसला. शेतीमध्ये कीटकनाशकांचा वाढता वापर होत असल्यामुळे त्यांच्या व आसपासच्या गावांत कॅन्सर पाय पसरत असल्याचे लक्षात आले. आपल्या सहा वर्षांच्या अमनज्योतला अशा विषयुक्त भाज्या खाण्याची वेळ येऊ नये यासाठी त्या विचार करत होत्या. सेंद्रिय शेतीत काम करणा-या "खेती विरासत मिशन' या संस्थेच्या आधारातून त्यांची भीती दूर झाली. अमनजित कौर यांची कमलजित यांनी भेट घेतली. त्यांनी किचन गार्डनमध्ये सेंद्रिय पद्धतीने भाज्या पिकवण्याचा सल्ला दिला. संस्थेने त्यांना गूळ, मध, कडुनिंब आणि हिंग आदींपासून स्वदेशी कीटकनाशक आणि खतनिर्मिती शिकवली. शेतीचे महत्त्व सांगितले. यानंतर कमलजित यांनी किचन गार्डनमध्ये भाज्या लावल्या. यानंतर त्यांनी अन्य महिलांनाही यासाठी प्रोत्साहन दिले. कामधाम नाही म्हणून हे उद्योग सुचतात. घर परिसरात शेती केल्यास साप येतील, अशी भीती महिलांना दाखवण्यात आली. मात्र, त्या या कामातून मागे हटल्या नाहीत. एक-एक करून गावातील सर्व २६० घरांतील महिलांना मोहिमेत जोडले. भोतणानंतर दोघांनी शेजारी गावांतील
महिलांना सेंद्रिय शेती मोहिमेत सहभागी करून घेतले. मल्लियामध्ये ६३ वर्षीय राजविंदर कौर यांनी त्याची सुरुवात केली.
कोणत्या गावात कॅन्सरचे सर्वाधिक रुग्ण आहेत याची आम्ही माहिती घेत आहोत. पंजाबमध्ये कीटकनाशकांचा अतिवापर थांबत नाही तोपर्यंत आजार वाढतील. कीटकनाशक वापरलेल्या भाज्या हे त्यामागचे कारण आहे. फवारणीनंतर २४ ते ४८ तास भाजी खुडली जाऊ नये. मात्र, तसे न होता ती त्वरित बाजारात येते. सुरजित ज्याणी, आरोग्यमंत्री, पंजाब