आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कानपूर: सपा नेत्याची 6 मजली इमारत कोसळली; 7 मजूर ठार, 8 जखमी, 50 अडकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर- शहरातील जाजमऊ भागात समाजवादी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष महताब आलम यांची अंडर कंस्ट्रक्शन इमारत बुधवारी कोसळली. या दुर्घटनेत 7 मजूरांच्या मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी आर्मीचे जवान आणि एनडीआरएफचे जवान पोहोचले असून ढिगारा उपसण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. 12 मजूरांना सखरुप बाहेर काढण्यात जवानांना यश आले आहे. ढिगार्‍याखाली 50 मजूर अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सहाव्या मजल्याच्या स्लॅबचे काम सुरु असताना कोसळली बिल्डिंग...
-पोखरपुर भागात  महताब आलम यांच्या मालकीच्या 6 मजली बिल्डिंगचे बांधकाम सुरु होते. दुर्घटना घडली तेव्हा 50 पेक्षा जास्त मजूर काम करत होते. 
- सहाव्या मजल्याचा स्लॅब टाकण्याचे काम सुरु असताना अचानक बिल्डिंग कोसळली. बांधकाम परिसरात बहुतांश मजुरांच्या झोपड्या होत्या. या झोपड्यांवरच ही इमारत कोसळली आहे. मजूरांच्या पत्नी, मुले ढिगार्‍याखाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे.  
- एसएसपी आकाश कुलहरी यांनी सांगितले की, सात मृतदेह बाहेर बाढण्यात आले आहे. जखमींचा कासीराम ट्रामा सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, दुर्घटनेची भीषणता दर्शवणारे फोटोज आणि व्हिडिओ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)