आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामकाजावेळी सोशल मीडिया वापरास मनाई - पंजाब हायकोर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - कामकाज सुरू असताना नेट सर्फिंग करणे, फेसबुक, व्हॉट‌्सअॅपसारख्या सोशल मीडियावर कॉमेंट टाकून अपडेट राहणे आता न्यायालीन कर्मचाऱ्याला महागात पडू शकते. कारण असे करण्याला पंजाब - हरियाणा उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. याबाबत न्यायालयाकडून कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यात कामकाज सुरू असताना अपडेट करताना स्टाफ कर्मचारी आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

न्यायालयाकडून जारी दिशानिर्देशांमध्ये म्हटले आहे की, काही कर्मचारी कार्यालयीन कामाच्या वेळेतदेखील व्हॉट‌्सअॅप, फेसबुकवर कॉमेंट टाकतात. स्मार्टफोनवर इंटरनेट सर्फिंग करतात. त्यामुळे कामकाजात व्यत्यय येतो. परंतु यापुढे त्यांना तसे करता येणार नाही. कार्यालयीन कामाच्यावेळेत मोबाइलचा वापर केवळ अत्यावश्यक परिस्थिती किंवा कुटुंबाशी बोलण्यासाठीच करता येईल. कामकाजाच्या वेळेत जर कुणी अधिकारी/ कर्मचारी इंटरनेट सर्फिंेग करताना अथवा व्हॉट‌्सअॅप, फेसबुक किंवा टि्वटरवर स्टेटस अपडेट करताना, कॉमेंट टाकताना आढळल्यास त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...