आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंधू जल संधीवर भारत-पाकिस्तान चर्चा निष्फळ, कोणताच तोडगा नाही - वर्ल्ड बँक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन/नवी दिल्ली - सिंधू जल करारावर (IWT ) भारत-पाकिस्तानची चर्चा निष्फळ ठरली आहे. दोन्ही देशांदरम्यान यासंबंधी कोणताही समझौता होऊ शकलेला नाही. जागतिक बँकेने यासंबधीची माहिती देताना म्हटले आहे की, ते यासंबंधीची आपली जबाबदारी पूर्ण करण्यात कोणताही कसूर करणार नाही. निष्पक्ष पद्धतीने आमचे काम सुरुच राहिल. 
 
रातले-किशनगंगा प्रोजेक्टच्या तंत्रज्ञानवर झाली चर्चा 
- भारत आणि पाकिस्तान दरम्यान रातले आणि किशनगंगा हायड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्टवर दुसऱ्या राऊंडची चर्चा झाली. यावेळी इस्लामाबादने आपली आडकाठी कायम ठेवली. ही चर्चा वॉशिंग्टन येथील जागतिक बँकेच्या हेडक्वार्टरमध्ये 14 आणि 15 सप्टेंबर रोजी झाली. दोन्ही देशांदरम्यान जागतिक बँकेच्या नेतृत्वात चर्चा झाली. 
- जागतिक बँकेने IWT च्या मर्यादेत राहून रातले आणि किशनगंगा हायड्रोइलेक्ट्रिक पॉवरवर सचिव पदाची चर्चा झाल्यानंतर हे निवेदन केले आहे. 
जागतिक बँकेने म्हटले आहे की बैठकी दरम्यान कोणत्याही करारावर एकमत होऊ शकले नाही. मात्र जागतिक बँक या मुद्द्यावर सांमजस्याने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत राहील. 
 
काय आहे सिंधू जल करार 
- भारत-पाकिस्तान दरम्यान पाणी वाटपावरुन सिंधू जल संधी (इंडस वॉटर ट्रीटी) करण्यात आली होती. 
- या करारावर 19 सप्टेंबर 1960 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अयूब खान यांनी कराचीत स्वाक्षरी केली होती. 
- या करारांतर्गत सहा नद्या, व्यास, रावी, सतलज, सिंधू, चिनाब आणि झेलम यांच्या पाणी वाटपावर आणि वापरावर दोन्ही देशांचा हक्क आहे. या करारात जागतिक बँक मध्यस्थ आहे. 
- हा करार यासाठी करण्यात आला कारण सिंधू उगम असलेल्या सर्व नद्या भारतात आहेत. (सिंधू आणि सतलजचे उमगस्थान हे चीन आहे.) 
- करारानुसार, भारताला सिंचन, वाहतूक आणि उर्जा निर्मितीसाठी या नद्यांच्या वापराला परवानगी आहे. त्याच बरोबर या नद्यांवरील भारताच्या प्रकल्पांच्या बांधकामासंबंधी अनेक कडक निर्बंध आणि अटी आहेत. 
- पाकिस्तानला भीती आहे की भारतासोबत युद्ध झाले तर भारत पाकिस्तानमध्ये दुष्काळाची स्थिती निर्माण करेल. 
बातम्या आणखी आहेत...