आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Biggest Cannon Story Jaigarh Fort Story Pride Of Jaipur

आशियातील सर्वांत मोठी तोफ; डागल्‍यामुळे तयार झाला तलाव, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - आपल्‍या देशाला राजे-राजवाड्याची परंपरा आणि इतिहास आहे. इतिहासाच्‍या प्रत्‍येक पानावर पराक्रमाच्‍या आणि शौर्याच्‍या गाथा वाचायला मिळतात. आज तुम्‍हाला आम्‍ही जयपूरमधील सर्वात मोठ्या तोफेचा इतिहास सांगणार आहेत. रणांगणावर शत्रूचा पाडाव करण्‍याबरोबरच राज्‍याच्‍या विकासासाठी तोफ कशाप्रकारे योगदान देते याची प्रचिती तुम्‍हाला या तोफीची माहिती वाचल्‍यानंरत येईल.

जयपूरपासून 35 किलोमिटर दूरवर असलेल्‍या एका गावात तोफ डागल्‍यामुळे चक्क एका मोठ्या तलावाचा निर्मिती झाली. आजही या तलावातील पाण्‍यामुळे गावक-यांची तहान भागवली जात आहे. अरावली पर्वत रांगांवर असलेल्‍या जयगढ दुर्ग वर ही तोफ आजही दिमाखात उभी आहे. जगातील सर्वात मोठी तोफ म्‍हणून या तोफेची नोंद झाली आहे.
आशियातील सर्वात शक्‍तीशाली तोफ
आशियातील सर्वात मोठी तोफ जयगढच्‍या किल्‍ल्‍यावर डूंगर दरवाज्‍यात ठेवण्‍यात आली आहे. या तोफेची नळी 31 फुट 3 इंच लांबीची आहे. पहिल्‍या वेळस या तोफेचा वापर केला तर जयपूरपासून 35‍ किलो मिटवर एक तलाव निर्माण झाला. ही तोफ एकदा डागण्‍यासाठी 100 किलो गन पावडर ( दारू) चा वापर केला जातो. या तोफेचे वजन टनांमध्‍ये असल्‍यामुळे या तोफेची आजपर्यंत जागा बदलेलली नाही.
पुढील स्‍लाइड्वर पाहा या तोफेची छायाचित्रे...