हबीबगंज रेल्वे स्टेशनला मध्य भारतीय रेल्वे स्टेशनचे हब तयार करण्यासाठीचा व्हिजन 2020 हा मास्टर प्लान तयार झाला आहे. जर्मर्नीचे बर्लीन स्टेशन आणि चीनच्या त्यांजीन वेस्ट रेल्वे स्टेशनच्या धर्तीवर हे स्टेशन तयार करण्यात येणार आहे. हे दोन्ही रेल्वे स्टेशन एखाद्या विमानतळासारखे आहेत. या स्टेशनचा सर्वे केल्यानंचरच हबीबगंज रेल्वे स्टेशनचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
या स्टेशनमध्ये कॉन्फरन्स हॉल, बिझनेस सेंटर, रिटेल शॉप, संग्राहलय, आर्ट गॅलरी, रेस्तरॉसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी केंद्र तयार करण्याचाही प्रस्ताव माडण्यात आला आहे. या सर्व सुविधांमुळे प्रवास आरामदायी तर होईलच पण रेल्वेची वाट पाहात बसण्यापेक्षा प्रवासांकडे अनेक पर्याय उपलब्ध होतील.
भारतीय रेल्वे स्टेशन विकास महामंडळ(आयरडीसी) ने येणा-या 40 वर्षात भोपाळ शहराचा होणारा विकास लक्षात घेऊन हा आराखडा तयार केला आहे. राज्य सरकार आणि रेल्वे अधिकारांच्या 12 फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत हा प्रकल्प पहिल्यांदाच सादर करण्यात आला.
हा प्रकल्प तयार होण्यासाठी 6 वर्षाचा काळ लागेल. विशेष बाब म्हणजे हा प्रकल्प शहारातील ट्रांसपोर्ट सिस्टमला जोडतो. देशात असे वर्ल्ड क्लास 50 स्टेशन तयार करण्यात येणार असून मध्ये प्रदेशातील केवळ हबिबगंज स्टेशनचा यात समावेश असल्याचे (आयरडीसी)च्या अधिका-यांनी सांगितले.
पुढीस स्लाइडवर वाचा सविस्तर वृत्त...