जयपुर- राजस्थानचे आज स्वप्न पूर्ण झाले. आता या गुलाबी शहराला नवी ओऴख मिळाली आहे ती म्हणजे मेट्रो सिटी. मानसरोवर मेट्रो स्टेशनवरर मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी आज हिरवा झेंडा दाखवताच मेट्रो धावू लागली. जयपुर मेट्रो जगातील अशी पहिली ट्रॅफिक त्रिस्तरीय व्यवस्था आहे जी जगात कोठेही नाही. या मेट्रोच्या खाली रस्ता असून तेथून वाहने जात आहेत. त्यावर एलिवेटेड रोड आणि सगळ्यात वर मेट्रो ट्रेन चालणार आहे.
मानसरोवर आणि चांदपोल याठिकाणी मेट्रोचे दोन मिनिटांचे थांबे असतील. बाकी ठिकाणी प्रवाशांच्या संख्येनुसार सुमारे 30 ते 40 सेकंद थांबेल. मेट्रो सकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत चालेल. प्रत्येक 10 मिनिटाला मेट्रो सुटेल.
या मेट्रोचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला स्त्रीशक्तीच्या इंजिनाची जोड लाभली आहे. कारण 24 सदस्यांच्या चालक दलाच्या पथकात सहा महिलांचा समावेश आहे. या रेल्वेत एका वेळी 1230 व्यक्ती प्रवास करू शकतील. पूर्णपणे अत्याधुनिक असलेल्या या प्रकल्पात मेट्रो ट्रेनच्या मागे पुढच्या कोचमध्ये कोलिजन बीम बसवण्यात आले आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही मेट्रो ट्रॅकवरून उतरणार नाही.
चला तर पुढे स्लाईड्सच्या माध्यमातून आपण पाहूया कशी आहे पिंकसिटी जयपूरची मेट्रो...