आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या महाराजांच्या होत्या 365 राण्या, महालात अशा रंगायच्या रात्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराज भुपिंदरसिंग - Divya Marathi
महाराज भुपिंदरसिंग
चंदीगड - पटियाला राजघराण्याचे महाल आजही महाराजा भुपिंदरसिंग यांच्या 365 राण्यांचे किस्से सांगतात. महाराजा भुपिंदरसिंग यांनी 1900 ते 1938 दरम्यान येथे राज्य केले. आज (18 एप्रिल) जागतिक वारसा दिन आहे. यानिमीत्ताने divyamarathi.com सांगत आहे पटियाला महाराजांच्या त्या महालांचे किस्से, ज्यांचा समावेश देशाच्या एतिहासिक वारशात झाला आहे.

भव्य महालात राहात होत्या राण्या
- इतिहासकारांच्या मते महाराज भुपिंदरसिंग यांच्या 10 अधिकृत राण्यांबरोबर एकूण 365 राण्या होत्या.
- महाराजांच्या राण्यांचे किस्से आज इतिहास जमा झाले असले तरी त्यांचे महाल आता एतिहासिक वारसास्थळे घोषित झाली आहेत.
- महाराजांच्या 365 राण्यांसाठी पटियालात भव्य महाल बांधण्यात आले होते. राण्यांच्या आरोग्याची काळजी ही पटियाला राजघराण्याची खासियत राहिली आहे. त्यासाठी येथे आरोग्य चिकित्सकांची एक विशेष टीम तैनात असायची. त्यांच्या इच्छे नुसार प्रत्येक गोष्टीचा त्यांना पुरवठा केला जात होता.
365 राण्यांसोबत कसे राहात होते महाराज भुपिंदरसिंग
- दिवान जरमनी दास यांच्या म्हणण्यानुसार, महाराज भुपिंदरसिंग यांना त्यांच्या 10 पत्नींपासून 83 मुले झाली त्यातील फक्त 53 जगू शकली.
- महाराज आपल्या 365 राण्यांना कसे खूष ठेवत होते, याचा एक प्रसिद्ध किस्सा आहे.
- असे म्हणतात, की पटियाला महालात रोज 365 कंदिल लावले जात होते. त्या प्रत्येकावर त्यांच्या राणीचे नाव लिहिलेले होते.
- जो कंदिल सकाळी लवकर विझेल त्यावर लिहिलेल्या राणीसोबत महाराज शय्यासोबत करत असायचे, अशी येथील परिचीत कथा आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, महाराज भुपिंदरसिंग यांचे ऐतिहासिक वारसा घोषित झालेले महाल
बातम्या आणखी आहेत...