आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOGRAPHY DAY: भोपाळची ऐतिहासिक छायाचित्रे, काळाच्या मागे जा हरखून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
19 ऑगस्‍ट हा दिवस जगभर WORLD PHOTOGRAPHY DAY म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आजच्या दिवशी 1939 मध्ये फोटोग्राफीला सुरूवात झाली. आज फोटोग्राफीला 175 वर्षे पूर्ण होत आहेत.
वर्ल्‍ड फोटोग्राफी दिनानिमित्त आज आम्‍ही आपल्याला मध्य प्रदेशची राजधानी भोपाळची ऐतिहासिक पार्श्वभूमी छायाचित्रांच्‍या माध्‍यमातून सांगणार आहोत. या छायाचित्राच्‍या माध्‍यमातून तुम्‍हाला भोपाळचा इतिहास काय होता, याची माहिती तर मिळेलच. याशिवाय काही युनिक छायाचित्रेही पाहायला मिळणार आहेत.


फोटोग्राफीचा नियम-
फोटोग्राफर होण्‍यासाठी फोटो क्लिक पद्धत माहीत असायला हवी. याबरोबच टेक्निकल पॉईट्सची माहिती असायला हवी. कॅमेर्‍याची लेन्‍स, कॅमेर्‍याचा आकार, त्‍याची बॉडी याविषयी ज्ञान असायला हवे.

भोपाळ शहराचा संस्‍थापक-
मध्‍य प्रदेशची राजधानी म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या भोपाळ शहराची स्‍थापना 11 व्‍या शतकात झाली होती. या शहराला 'भोजपाल' नावाने ओळखले जात होते. या शहराचा ताबा अफगानचा राजा सिपहसालार दोस्‍त मोहम्मद याने घेतला. 1708- 7140 या काळात दोस्‍त मोहम्मद याचे वर्चस्‍व या शहरावर होते. या राजाने भोजपालचे 'भोपाळ' असे नामकरण केले.

औरंगजेबाच्‍या मृत्‍युनंतर दिल्ली राज्‍यामध्‍ये यादवी निर्माण झाल्‍यामुळे मोहम्मद याने पलायन करून भोजपालमध्‍ये आश्रय घेतला होता. या काळात गोंड राणी कमलापतिला मदत करून तिचा विश्वास संपादन केला व भोजपाल शहर आपल्‍या ताब्यात घेतले. भोपाळमधील जुन्‍या शहरातील जुना बाजार, महाल आजही भुतकाळाची आठवन करून देत आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा भोपाळची ऐतिहासीक छायाचित्रे...