आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिबेटच्या निर्वासित सरकारसाठी मतदान, 45 जागांसाठी 94 उमेदवार रिंगणात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्मशाला - तिबेटी लोकांनी रविवारी आपले निर्वासित सरकार निवडण्यासाठी भारतासहित अनेक देशांत मतदान केले. ही निवडणूक १६ वी संसद आणि सिक्योंग (पंतप्रधान) निवडण्यासाठी होत आहे. संसदेच्या ४५ जागांसाठी ९४ उमेदवार मैदानात आहेत. निकाल २७ एप्रिलला जाहीर होईल.

तिबेटीच्या निर्वासित सरकारची राजधानी धर्मशाला आहे. दलाई लामाही येथेच राहतात. तिबेटच्या केंद्रीय प्रशासनाच्या प्रवक्त्याने सांगितले की, निवडणुकीचे पर्यवेक्षक म्हणून युरोपियन संसदेचे प्रतिनिधी धर्मशाला येथे आले आहेत. भारतात निर्वासित म्हणून राहत असलेले तिबेटी नागरिक बंगळुरू, दिल्ली, दार्जिलिंग, बाइलकूप आणि डेहराडून येथे मतदान करत आहेत. मतदान करण्यासाठी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अनेक ठिकाणी मोठ्या रांगा लागल्या होत्या. जगभरातील जवळपास ९० हजार तिबेटी नागरिकांनी या निवडणुकीसाठी मतदार म्हणून नोंदणी केली आहे. अमेरिका, जपान, रशिया आणि ऑस्ट्रेलियामध्येही मतदान होत आहे. तिबेटींचे आध्यात्मिक गुरू दलाई लामा या निवडणुकीत मतदान करत नाहीत.

पंतप्रधान पदाच्या दोन प्रमुख उमेदवारांत विद्यमान पंतप्रधान लोबसांग सांगे यांचाही समावेश आहे. त्यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात पूर्ण होत आहे. दुसरे उमेदवार संसदेचे विद्यमान अध्यक्ष पेंपा त्सेरिंग आहेत.