आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Worship At Night Was The Second Asaram Overnight Raping Children

गुरुकुल आश्रमातील अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण? संचालकाविरुद्ध तक्रार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायगड- छत्तीसगडमधील रायपूरमधील एका गुरुकुल आश्रमाच्या संचालकावर अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोधण केल्याचा आरोप आहे. विद्यार्थिनींच्या पालकांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार गुरुकुल आश्रमाचा संचालक रमानंद गेल्या अनेक महिन्यांपासून आश्रमातील विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण करत आहे.

पीडितांमध्ये विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींचाही समावेश आहे. रायगडचे जिल्हाधिकारी मुकेश बंसल यांनी याप्रकरणी चौकशी करण्यासाठी आज (रविवार) पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे. एसडीएम केएस मंडावी यांच्यासह अन्य चार सदस्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.

काय आहे प्रकरण...
विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितले, की सलखिया येथील आर्य विद्या मंदिराच्या स्वामी गुरुकुल आश्रमात रात्री नऊ वाजता परेमश्वराची आराधना केल्यानंतर विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ केला जातो. गेल्या अनेक महिन्यांपासून हा गोरखधंदा आश्रमात खुलेआम सुरु असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
सलखिया येथील गुरुकुल आश्रमात आदिवासी विद्यार्थ्यांसह 319 चिमुरडे शिक्षण घेतात. वार्षिक परिक्षा झाल्यानंतर बहुतेक विद्यार्थी सुटीत घरी निघुन जातात. गरीब मुलांना गुरुकुल आश्रमात थांबवून घेतले जाते. त्यांच्याकडून आश्रमातील अन्य काम या काळात करून घेतले जाते.