आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्कर भरतीसाठीही होणार लेखी परीक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - भारतीय लष्कराच्या भरती प्रक्रियेत आगामी काळात मोठे बदल होत असून यासाठी आधी लेखी परीक्षा होईल. उत्तीर्ण उमेदवारांनाच पुढील चाचण्यांसाठी बोलावले जाईल.
लष्करी मुख्यालयातील भरती संचालक मेजर जनरल जे. के. मारवाल यांनी सांगितले की, लेखी परीक्षेचा प्रस्ताव सध्या सरकारच्या विचाराधीन आहे. तो मंजूर होताच त्याची अंमलबजावणी केली जाईल. हा भरती प्रक्रियेतील मोठा बदल असून त्यामुळे प्रशासकीय व्यवस्था व प्रक्रियेवरील ताणही कमी होईल. सध्या उमेदवाराने शारीरिक क्षमता व वैद्यकीय चाचणी पूर्ण केल्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाते. नव्या पद्धतीमुळे उमेदवाराला थेट फायदा होईल आणि संबंधित जिल्हा प्रशासनालाही भरती करताना जास्त अडचणी येणार नाहीत. वर्षातून एकदा तरी प्रत्येक जिल्ह्यात भरती प्रक्रिया केली जावी, असा आमचा प्रयत्न असतो.

भरती प्रक्रिया पूर्णत: ऑनलाइन असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची गडबड होण्याची शक्यता नाही, असे मारवाल म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...