आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पश्चिम बंगालमध्ये परीक्षेतील नकाशात दाखवला चुकीचा नकाशा, PoK दाखवले पाकिस्तानात : BJP

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये झालेल्या माध्यमिक परीक्षेत भारताचा चुकीचा नकाशा छापल्याचा आरोप भाजपने केला आहे. भारताचे म्हणणे आहे की, यात PoK हा पाकिस्तानचा आणि अरुणाचल प्रदेश चीनचा भाग दाखवला आहे. भाजपचे सरचिटणीस राजू बॅनर्जी म्हणाले की, विद्यार्थ्यांना दिलेले नकाशे तुम्ही पाहू शकता. त्यात पीओके, अक्साई चीन, अरुणाचल प्रदेशला भारतीय सीमेच्या बाहेर दाखवले आहे. हे सर्व टीएमसी (तृणमूल काँग्रेस) च्या गटातील शिक्षकांनी केले आहे. 


एएनआयच्या वृत्तानुसार राजू बॅनर्जी म्हमाले हा चुकीचा नकाशा भुगोलाच्या परीक्षेत छापण्यात आला आहे. पुढे ते म्हणाले, मॅपच्या वॉटर मार्कवर WBBSC लिहिलेले आहे. हा वॉटरमार्क वेस्ट बंगाल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनचा आहे. राजू म्हणाले, सध्याचे सरकार भारतीय सीमेबाबतच्या पाकिस्तान आणि चीनच्या दाव्यांशी सहमत आहे का याचे उत्तर द्यावे. बंगालमध्ये लोकशाही नावाचा प्रकार नसल्याचे सांगत त्यांनी तृणमूलवर टीका केली. 


मुद्दा लावून धरणार 
- राजू म्हणाले, तृणमूल दहशतवाद्यांना मदत करते. आम्ही हा मुद्दा गांभीर्याने घेत आहोत. यावर कारवाईसाठी आम्ही मनुष्यबळविकास मंत्रालयाला पत्रही लिहिलत आहोत. 
- राज्यात जे होतेय ते योग्य नाही, भाजप हा मुद्दा सोडणार नाही. आम्ही याविरोधात आवाज उचलू असेही ते म्हणाले. 
- भाजपचे राष्ट्रीय सचिन राहुल सिन्हा यांनीही तृणमूलवर टीका केली. ते देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. ममता बॅनर्जींवरही त्यांनी टीका केली. 
- या प्रकरणामागे काहीतरी कट असून त्यावर कारवाई होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. 


या राज्यांच्या PAK ला लागून आहेत सीमा.. 

3323 किमीची एकूण भारत- पाकिस्तान सीमा 
1225 किमीची जम्मू-काश्मीर-पाक सीमा (LoC सह)
1037 किमी राजस्थान-पाक सीमा 
553 किमी पंजाब-पाक सीमा 
508 किमी गुजरात-पाक सीमा 

 

पुढे वाचा, भारत-चीन सीमेबाबत वाद...

बातम्या आणखी आहेत...