आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटक लोकायुक्त राव यांचा राजीनामा, मुलाच्‍या गैरकृत्‍यामुळे सोडले पद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - कर्नाटकचे लोकायुक्त वाय. भास्कर राव यांनी अखेर राजीनामा िदला आहे. त्यांच्या मुलावर लोकायुक्तांच्या कार्यालयातच वसुलीचे रॅकेट चालवण्याचा आरोप होता. त्यानंतर त्यांना हटवले जाणार असल्याची चर्चा सुरू होती. विरोधकांनीही त्यासाठी सरकारवर दबाव आणण्यास सुरूवात केली होती. भास्कर राव यांनी सोमवारी राजीनामा दिला. मंगळवारी राज्यपालांनी तो स्वीकारला आहे.

अवैध वसुलीच्या प्रकरणात लोकायुक्त भास्कर राव यांचा मुलगा अश्विन राव याला एसआयटीने जुलैमध्ये अटक केली आहे. तेव्हापासून त्यांनी राजीनामा द्यावा, यासाठी त्यांच्यावर दबाव येत आहे. दरम्यान संयुक्त जनता दल व भाजपने विधानसभेत लोकयुक्तांना हटवण्याच्या मागणीसाठी संयुक्त प्रस्ताव दिला होता. तो विचाराधीन हाेता व सत्ताधारी काँग्रेसनेही त्या प्रस्तावाचे समर्थन केले होते.
वसुली रॅकेटची भानगड
लोकायुक्त पोलिस अधीक्षक. सोनिया नारंग यांच्याकडे एका व्यक्तीने तक्रार केली होती की, एका व्यक्तीने लोकायुक्तांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी १ कोटी रुपयांची लाच मागितली होती. त्यांनी लोकायुक्त रजिस्ट्रारना त्याबाबत पत्र लिहिले होते. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. त्याच्या तपासात एसआयटीने राव यांच्या मुलासह ११ जणांना अटक केली होती.
बातम्या आणखी आहेत...